गेल्या वर्षभरात ८८% पर्यंत रिटर्न दिलेले ५ म्युच्युअल फंड

These funds performed much better than Nifty Midcap 150 TRI

एप्रिल २०२० पासून  मार्केट मध्ये आलेल्या तेजीमुळे अनेक मिडकॅप शेअर्समध्ये वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच मिडकॅप फंडांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. जवळपास २७ मिडकॅप फंडांनी निफ्टी मिडकॅप १५० हून अधिक रिटर्न्स दिले. यापैकी ५ फंड ज्यांची मालमत्ता १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे ते खालीलप्रमाणे.

१. पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड, हा तब्बल ८८% रिटर्नसह पहिल्या क्रमांकावर आहे. ह्या फंडाद्वारे सॉफ्टवेअर, केमिकल्स आणि हेल्थकेअर सेगमेंटवर लक्ष केंद्रित केल्याने फंडाने उत्कृष्ट कामगिरी केली. याची २३८३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे तर २.२६ टक्के एक्सपेंस रेशिओ आहे.

२. मिराइ ऍसेट मिडकॅप फंड ७६% परताव्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कन्झ्युमर नॉन ड्युरेबल्स, फार्मास्युटिकल्स आणि औद्योगिक उत्पादन या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. फंडाची एकूण मालमत्ता ५९२७ कोटी तर एक्सपेंस रेशिओ  १.८७ टक्के आहे.

३. एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडाने गेल्या एका वर्षात जवळपास ७४%  परतावा नोंदवला आहे. फंडाने इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्झ्युमर गुड्स च्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरली. याची एकूण मालमत्ता ५९२९ कोटी तर  एक्सपेंस रेशिओ २.०८ टक्के आहे.

४. गेल्या एका वर्षात ७२% टक्के परतावा देऊन, एडलवाईस मिडकॅप फंड चौथ्या क्रमांकावर आहे. फंडाची मालमत्ता १६०० कोटी रुपये  आणि एक्सपेन्स रेशो २. २१ टक्के आहे .

५. कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने गेल्या एका वर्षात ७१% टक्के परतावा दिला आहे. या फंडाची मालमत्ता तब्बल १५१९३ कोटी रुपये एवढी असून फंड सर्वात मोठ्या मिडकॅप फंडांपैकी एक आहे. इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट्समी सिमेंट आणि बँका यांच्यात केलेली गुंतवणूक फंडाला फायदेशीर ठरली.

Comments are closed.