5 वर्ष आणि 1 बिलियन डॉलर उभारण्याचे नियोजन, वाचा सविस्तर ‘ह्या’ कंपनीच टार्गेट

Page Industries aims to be $1 billion company in next 5 years

भारतातील जॉकी आणि स्पीडोची परवानाधारक कंपनी पेज इंडस्ट्रीजचे सीईओ आणि कार्यकारी संचालक व्ही एस गणेश म्हणाले, कंपनी पुढील पाच वर्षांत एक अब्ज डॉलरची कंपनी बनण्याचे लक्ष ठेवते आहे. कंपनीने आपला उत्पादन पोर्टफोलिओ आणि बाजारपेठेत विस्तार केल्याने कंपनीची वाढ जवळपास 2.5 पटीने वाढणार आहे.

कंपनीने सोमवारी भारतात जॉकीचे 1,000 वे एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअर (ईबीएस) उघडण्याची घोषणा केली आहे. कंपनी जलद वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे आणि आगामी काही वर्षांमध्ये स्टोअरची संख्या दुप्पट करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

कंपनी आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि पुरवठा सुधारण्यासाठी गुंतवणूक करेल आणि त्यांच्या धोरणानुसार, महिलांची अंतर्वस्त्रे, लहान मुलाचे कपडे याव्यतिरिक्त अथलीझर पोशाखांवर लक्ष केंद्रित करत आहे,ज्याना कोविडनंतर महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही ते म्हणाले.

2026 पर्यंत एक अब्ज डॉलर्सची कंपनी बनण्याची आमची आकांक्षा आहे, ज्याचा अर्थ पुढील पाच वर्षात 2.5 ते 2.75 पट वाढ होईल, यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. येथे कसे जायचे याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट आहोत आणि त्यासाठी आम्ही किरकोळ, ई-कॉमर्स, ओमनी वितरण चॅनेलद्वारे अधिकाधिक बाजारपेठांव्दारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करू.

उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी कंपनी आपली पुरवठा साखळी बळकट करण्यावर भर देईल. 1 अब्ज डॉलर्स विक्रीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्राहकांसाठी आम्ही वितरण सेवा वाढवू.

31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी पेज इंडस्ट्रीजने 2,833 कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती. ती 2019-20 मध्ये 2,945.5 कोटी रुपये होती.

कंपनीने चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जूनमध्ये ऑपरेशनमधून मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास 76.08 टक्के वाढ नोंदवली आहे.

त्यांच्या मते, जॉकी एक प्रभावी प्लेअर आणि एक प्रमुख पोशाख ब्रँड असला तरी, पुरुषांच्या अंतर्वस्त्रे मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा फक्त 18 टक्के आहे आणि पेज इंडस्ट्रीज आणि सेगमेंटमध्ये येणाऱ्या इतर प्लेअरकरिता वाढीची पुरेशी संधी आहे.

ते म्हणाले, “सध्या आम्ही धावपट्टीवर आहोत, मात्र अजून खेळात उतरलो नाही, आम्ही खूप उत्साही आहोत”.

ई-कॉमर्सकडे ग्राहकांची पसंती वाढल्यामुळे, पेज इंडस्ट्रीज त्यासाठी तयार आहे आणि ऑफलाईनचा विस्तार करण्याबरोबरच ट्रेंड पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानात देखील गुंतवणूक केली आहे.

“आम्ही म्युटी ब्रँड आउटलेट (एमबीओ) आणि ई-कॉमर्स तसेच ऑम्निचॅनेलवर जास्त लक्ष देऊन आमचा विस्तार वाढवण्यावर भर देऊ.

पेज इंडस्ट्रीजने ई-कॉमर्समध्ये जबरदस्त ट्रॅक्शन पाहिले आहे, जेथे ऑनलाइन चॅनेलचे त्यांच्या महसुलातील योगदान 3 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर गेले आहे.

ते म्हणाले, “आम्ही ऊर्जा, तंत्रज्ञानात भरपूर गुंतवणूक करत आहोत.

गणेश म्हणाले की पेज इंडस्ट्रीज “महिलांचे अंतर्वस्त्र आणि मुलांच्या कपडे यावर लक्ष केंद्रित करत आहोत.” कारण ह्या वाढत्या श्रेणी आहेत आणि तुलनात्मकदृष्ट्या नवीन आहेत,तसेच कंपनीसाठी ग्रोथ पॉइंट आहेत.

कंपनीचा दुसरा ब्रॅण्ड स्पीडोबद्दल बोलताना, गणेश म्हणाले की, सध्या व्यवसायासाठी हि एक कठीण वेळ आहे कारण कोविद नंतर जलतरण तलाव बंद आहेत.

Comments are closed.