1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग फी मध्ये करणार बदल – वाचा सविस्तर

1 डिसेंबर 2021 पासून SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड EMI व्यवहारांवर 99 रुपये फ्लॅट प्रोसेसिंग फी आणि कर आकारेल. बँक रिटेल आउटलेट्स आणि ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रोसेसिंग फी आकारेल. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

SBI ने प्रॉसेसिंग फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 डिसेंबरपासून नविन दर लागू केले जातील.

1 डिसेंबर 2021 पासून SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड EMI व्यवहारांवर 99 रुपये फ्लॅट प्रोसेसिंग फी आणि कर आकारेल. बँक रिटेल आउटलेट्स आणि ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रोसेसिंग फी आकारेल. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

जर व्यवहार 1 डिसेंबरपूर्वी केलेले असतील तर त्यावर सूट दिली जाईल. रिटेल आउटलेटवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना EMI व्यवहारांवरील प्रोसेसिंग फीची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल.

जर EMI व्यवहार रद्द झाल्यास प्रोसेसिंग फी रिफंड केली जाईल. परंतु प्री-क्लोजरच्या बाबतीत हे होणार नाही. मर्चंट EMI मध्ये रूपांतरित केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत.

एका रिटेल बँकरनुसार, “SBICPSL कडूनची प्रोसेसिंग फी ही इंडस्ट्री स्टँडर्डनुसार आहे. इतर आघाडीच्या खाजगी बँका ही फी बऱ्याच काळापासून आकारत आहेत.”

समजा, SBI क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही EMI योजनेअंतर्गत ई-कॉमर्स वेबसाइट्सपैकी एका वेबसाईटवरून खरेदी करत आहात तर SBICPSL तुमच्याकडून प्रोसेसिंग फी आणि टॅक्स म्हणून 99 रुपये आकारेल.

सदर प्रोसेसिंग फीचा ‘बाय नाऊ पे लेटर’ या योजनेवर परिणाम होऊ शकतो.

Comments are closed.