सिगाची इंडस्ट्रीजची तुफान एन्ट्री! तब्बल ‘इतक्या’ प्रीमियमवर स्टॉक झाला ओपन
सिगाची इंडस्ट्रीजने आज मार्केटमध्ये 252.76 टक्के प्रीमियमसह ट्रेड सुरू केला. BSE वर 163 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअर 575 रुपयांवर उघडला गेला.
सिगाची इंडस्ट्रीजने आज मार्केटमध्ये 252.76 टक्के प्रीमियमसह ट्रेड सुरू केला. BSE वर 163 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअर 575 रुपयांवर उघडला गेला.
लिस्टिंग तसेच ग्रे मार्केट प्रीमियमने इश्यू किमतीपेक्षा किमान 100 टक्के लिस्टिंग प्रीमियम दर्शविला होता. परंतू शेअर्सने सगळे रेकॉर्ड तोडले.
कंपनीच्या 125.43 कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. 1-3 नोव्हेंबर 2021 या कालावधीत IPO चे 101.91 वेळा सबस्क्रिप्शन घेण्यात आले होते. पात्र संस्थागत खरेदीदारांनी त्यांच्यासाठी ठेवलेल्या भागाच्या 86.51 पट शेअर्स खरेदी केली होती आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या भागाच्या 172.43 पट बोली लावली. किरकोळ गुंतवणूकदारांचा आरक्षित भाग 80.49 पट सबस्क्राइब झाला.
सध्या, कंपनी हैदराबाद आणि गुजरात येथे 11,880 MTPY च्या एकूण क्षमतेसह 59 विविध ग्रेडचे मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज तयार करते.
GACL च्या मालकीच्या उत्पादन युनिट्सचे संचालन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आणि युनिट्समध्ये सोडियम क्लोरेट, स्टेबल ब्लीचिंग पावडर आणि पॉली ॲल्युमिनियम क्लोराईडच्या कंत्राटी उत्पादनासाठी गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स (GACL) सोबत कंपनीने व्यवस्थापन करार देखील केले आहेत.
IPO मधून उभारलेला निधी गुजरातमधील दहेज आणि झगडिया येथे मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (MCC) च्या उत्पादन क्षमतेच्या विस्तारासाठी वापरला जाईल. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक्सीपियंट म्हणून वापरल्या जाणार्या सुधारित सेल्युलोजचे क्रॉसकारमेलोज सोडियम (CCS) उत्पादन करण्यासाठी निधी वापरला जाईल.
सर्व ब्रोकरेजनी सदर इश्यूवर सबस्क्राइब रेटिंग दिले होते.
Comments are closed.