’झील’ चा खतरनाक फील प्रॉफिट शिकावा तर फक्त झुनझुनवाला कडून, कमावले इतके कोटी

Rakesh Jhunjhunwala's company last week had bought 50L shares of Zee Entertainment at ₹220.40 per share

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या शेअर ट्रेडिंग फर्म RARE इंटरप्रायझेसद्वारे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सहा दिवसात 61 टक्के नफा मिळवला आहे.

त्यांच्या फर्मने 14 सप्टेंबर रोजी ZEEL मधील अर्धा टक्के हिस्सा उचलला होता. दरम्यान बोर्डरूमच्या वादाच्या बातम्यांमुळे नंतर स्टॉक वाढला.

झुनझुनवाला यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (एनएसई) 220.44 रुपये प्रति शेअरच्या दराने कंपनीमध्ये 50 लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. ज्याचे एकूण मूल्य 110.22 कोटी रुपये होते.

तेव्हापासून, 22 सप्टेंबरला ZEEL चे शेअर्स जवळपास 40 टक्क्यांनी वाढून 355.35 रुपयांच्या शिखरावर पोहोचले आहेत. सध्याच्या किमतीनुसार, RARE एंटरप्रायझेसने केलेली गुंतवणूक आता 177.67 कोटी रुपयांची आहे, ज्यामुळे 67.45 कोटी इतका त्यांना फायदा झाला आहे.

विशेष म्हणजे, संचालक मंडळाची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाल्यानंतरही स्टॉक मध्ये ही भरघोस वाढ नोंदविण्यात आली आहे.

22 सप्टेंबर रोजी शेअरच्या किमतीत आणखी वाढ झाली, कारण काल ZEEL ने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली आहे.

प्रस्तावित विलीनीकरणानंतर, एसपीएनआयच्या स्टेकहोल्डरकडे एकत्रित 52.93 टक्के स्टॉक असेल आणि झीच्या स्टेकहोल्डरकडे 47.07 टक्के स्टॉक असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

Comments are closed.