सावकाश सुरुवातीनंतर अखेरच्या दिवशी ‘हा’ IPO जोमात – वाचा सविस्तर

Rategain Travel Technologies ही जागतिक स्तरावरील आघाडीच्या वितरण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे आणि भारतातील हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील सेवा (SaaS) कंपनी म्हणून सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.

Rategain Travel Technologies ही जागतिक स्तरावरील आघाडीच्या वितरण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे आणि भारतातील हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील सेवा (SaaS) कंपनी म्हणून सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.

रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजच्या IPO ला मंगळवारी लॉन्च करण्यात आले होते, IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला, कारण शेवटच्या दिवशी IPO 17.41 पट सबस्क्राइब झाला.

1,335.73 कोटी रुपयांच्या ऑफरला 1.73 कोटी शेअर्सच्या एकूण इश्यू साइजच्या तुलनेत 30.20 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली.

पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) वाटप करण्यात येणारे शेअर्स 8.42 पट सबस्क्राईब झाले , तर गैर-संस्थागत गुंतवणूकदारांचे 42.04 पट आणि रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांचे (RIIs) 8.08 पट सबस्क्राईब झाले. कर्मचार्‍यांच्या विभागातील शेअर्स 1.37 पट सबस्क्राइब झाले.

1,335.73 कोटी IPO मध्ये 375 कोटी पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि प्रमोटी आणि विद्यमान स्टेकहोल्डरद्वारे 2.26 कोटी इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.

रेटगेन आयपीओ मंगळवार, 7 डिसेंबर, 2021 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला होता आणि गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद झाला. त्याची किंमत 405-425 रुपये प्रति शेअर होती आणि IPO मध्ये जाण्यापूर्वी, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 599 कोटी घेतले होते.

Rategain Travel Technologies ही जागतिक स्तरावरील आघाडीच्या वितरण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे आणि भारतातील हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील सेवा (SaaS) कंपनी म्हणून सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. कंपनी हॉटेल्स, एअरलाइन्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स (OTAs), मेटा-सर्च कंपन्या इत्यादी सुविधा ऑफर करते.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजसाठी शेअर वाटपाचे अंतिमीकरण मंगळवार, 14 डिसेंबर 2021 रोजी होणे अपेक्षित आहे.

Comments are closed.