रेमंड ब्रँडने प्रमोट केलेली ‘ही’ फर्म आणणार IPO – वाचा सविस्तर

JK Files and Engineering ने IPO द्वारे 800 कोटी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर इश्यू सध्याच्या प्रमोटी रेमंडकडून विक्रीची ऑफर असेल.

JK Files and Engineering ने IPO द्वारे 800 कोटी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर इश्यू सध्याच्या प्रमोटी रेमंडकडून विक्रीची ऑफर असेल.

ऑफरमध्ये कर्मचारी आणि रेमंड स्टेक होल्डर साठी आरक्षण असेल.

JK Files and Engineering टूल्स आणि हार्डवेअर (फाईल्स आणि ड्रिल्स) साठी कम्पोनेंट तयार करते. हँड टूल्स, पॉवर टूल अॅक्सेसरीज, पॉवर टूल मशीन्सचे उत्पादन कंपनी करते. याबरोबर ऑटो कॉम्पोनेंट्स आणि इंजिनिअरिंग उत्पादने (रिंग गीअर्स, फ्लेक्सप्लेट्स आणि वॉटर पंप बेअरिंग) तयार करते.

कंपनी स्टील फाइल्समध्ये जागतिक स्तरावर दुसरी सर्वात मोठी पुरवठादार आहे.

JK Files and Engineering ला अपेक्षा आहे की, या IPO मुळे स्टेकहोल्डरना लिक्विडिटी सोबतच विसीबिलिटी आणि ब्रँड इमेज मिळेल.

SBI कॅपिटल मार्केट्स, DAM कॅपिटल ॲडव्हायझर्स आणि HDFC बँक ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला प्रमोटीने सांगितले होते की, JK Files IPO रेमंडला डिलीवरीज करण्यास मदत करेल. IPO नंतर, ती रेमंडची मटेरियल सब्सिडियरी राहील.

Comments are closed.