‘ही’ स्टार्टअप IPO आणायच्या तयारीत,DRHP दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

आपला कॉलेजमित्र अंकित अग्रवाल याच्यासोबत Navi technologies हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल सदर स्टार्टअपचा IPO आणण्याची तयारी करत आहेत.

आपला कॉलेजमित्र अंकित अग्रवाल याच्यासोबत Navi technologies हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल सदर स्टार्टअपचा IPO आणण्याची तयारी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,”बन्सल यांनी गुंतवणूक बँकांना शॉर्टलिस्ट केले आहे आणि या आठवड्यात याबाबत करार होण्याची शक्यता आहे,”

सूत्रांनी सांगितले की, ॲक्सिस कॅपिटल, ICICI सिक्युरिटीज, BofA सिक्युरिटीज आणि क्रेडिट सुईस सल्लागार म्हणून आले आहेत आणि आवश्यक असल्यास आणखी बँका जोडल्या जाऊ शकतात.

फर्म DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सेबीकडे दाखल करू शकते.

इश्यू साइजबाबत बोलताना सूत्रांनी सांगीतले की, सदर इश्यू 500 मिलियन डॉलर इतका असू शकतो.

इन्शुरन्स क्षेत्रात, Navi tech पॉलिसीबाझार, डिजिट आणि अको यांच्याशी स्पर्धा करते, तर म्युच्युअल फंड स्पेसमध्ये, पेटीएम, ग्रो आणि झिरोधा सारखे स्पर्धक आहेत.

Comments are closed.