दिल्लीच्या “जोरबाग” मध्ये प्रॉपर्टी खरेदी करायचा “जोर” वाढला, तब्बल २१ कोटींना विकला गेलाय फ्लॅट
Seema Jindal has bought an apartment in Delhi’s posh Jorbagh area for Rs 21 crore
बिजनेसवूमन सीमा जिंदाल यांनी दिल्लीच्या पॉश समजल्या जाणाऱ्या जोरबाग भागात २१ कोटी रुपयांमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती Zapkey.com ने दिली.
जिंदाल समूहाचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांच्या कन्या सीमा जिंदाल यांनी सुमारे २६०० चौरस फूट क्षेत्रफळामध्ये विस्तारलेल्या फ्लॅटची खरेदी केली आहे. यात टेरेस राईट्स तसेच तीन पार्किंग स्लॉट उपलब्ध आहेत.
तसेच ४ ऑगस्ट रोजी “नरिश ऑरगॅनिक्स” च्या संस्थापकांनी चेतन प्रकाश यांच्याकडून मालमत्ता खरेदी केली.
संस्कार प्रोजेक्ट्स आणि हाऊसिंग लिमिटेड हे मालमत्तेचा पुनर्विकास करत आहेत. स्थानिक ब्रोकर्सच्या मते मालमत्तेचे एकूण क्षेत्र ४८०.७ चौरस मीटर आहे.
मात्र याबाबत सीमा जिंदाल यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
जोरबागमधील प्लॉट्सची किंमत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ब्रोकर्सच्या मते अपार्टमेंट्सची किंमत १५ कोटी रुपये आहे.
या भागातील अनेक मालमत्ता ह्या खाजगी विकासकांद्वारे पुनर्विकास करून चार मजल्यांमध्ये बदलल्या जात आहेत.
दिल्लीच्या पॉश ठिकाणी मालमत्तेचे व्यवहार केले गेले तर सुंदर नगर, गोल्फ लिंक्स, जोर बाग सारख्या भागात विकल्या गेलेल्या ३०-४० टक्के उच्च दर्जाच्या मालमत्तांमध्ये अनिवासी भारतीय मालकांचा समावेश आहे, असे रिअल इस्टेट तज्ञांनी सांगितले. .ही मालमत्ता कॅलिफोर्नियास्थित एनआरआयची आहे.
जोरबाग परिसरातील अनेक मालमत्ता सामान्यत: वकील किंवा उद्योगपतींना विकल्या गेल्या आहेत ज्यांच्या कामाची ठिकाणे जवळ आहेत, असेही ब्रोकर्सनी सांगितले.
अलीकडेच येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू राणा कपूर यांनी नवी दिल्लीतील जोरबाग येथे त्यांच्या मालकीची मालमत्ता त्यांचा नऊ महिन्यांचा नातू आशिव खन्ना याला भेट म्हणून दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी एमबीडी समूहाचे अध्यक्ष सतीश बाळा मल्होत्रा यांनी दिल्लीच्या सुंदर नगर भागातील एका अनिवासी भारतीयांकडून बंगला ६० कोटी रुपयांना विकत घेतला होता, असे Zapkey.com ने नोंदणी केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दक्षिण दिल्लीच्या वसंत विहारमधील कदाचित सर्वात महाग डीलमध्ये शैक्षणिक संस्थांच्या संस्थापकाने सुमारे १५० कोटी रुपयांना २,००० चौरस यार्डची मालमत्ता खरेदी केली होती, असे सूत्रांनी सांगितले.
६ एप्रिल २०२१ रोजी ही मालमत्ता आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या जे सी चौधरी यांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे.
Comments are closed.