1250 कोटींचा IPO साठी Snapdeal दाखल करणार DRHP – वाचा सविस्तर

सॉफ्टबॅकने गुंतवणूक केलेली फर्म Snapdeal आज SEBI कडे त्यांच्या IPO शी संबंधित कागदपत्रे दाखल करू शकते. या IPO मध्ये 1250 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे. या IPO मध्ये, Snapdeal चे प्रमुख गुंतवणूकदार त्यांचे शेअरहोल्डिंग 34 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आणू शकतात.

सॉफ्टबँक स्नॅपडीलमध्‍ये त्यांचा स्‍टेक सुमारे 50 मिलियन डॉलरपर्यंत उपलब्ध करणार आहे. बँक ऑफ अमेरिका, ॲक्सिस बँक आणि जेएम फायनान्शिअलच्या या IPO साठी कंपनीने बुक रनिंग लीड मॅनेजरची नियुक्ती केली आहे.

गेल्या आठवड्यात स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, Snapdeal चे 70% ग्राहक टियर 2 शहरांमधून आलेले आहेत जे स्नॅपडीलकडे वळतात आणि पैसे देऊन परवडणाऱ्या वस्तू खरेदी करतात.

Snapdeal चा IPO आला तर पेटीएम नंतर येणारा टेक कंपनीचा हा दुसरा सर्वात मोठा IPO असेल. स्नॅपडीलची स्थापना कुणाल बहलने 2010 मध्ये केली होती. कंपनीचे लक्ष टियर2 आणि टियर 3 शहरांवर अधिक आहे.

Comments are closed.