कोरोना बाजूलाच, मार्केटमध्ये फक्त टाटाच्या लाटा,‘ ह्या ‘ कारची भरघोस विक्री
Tata Motors announced today the roll out of its 1,00,000th unit of the Altroz, from its manufacturing facility in Pune. Altroz is India's only hatchback with a 5-star Global NCAP Safety Rating.
टाटा मोटर्सने मंगळवारी आपल्या हॅचबॅक अल्ट्रोझचे 1,00,000 वे युनिट कंपनीच्या पुणे येथील उत्पादन केंद्रातून उपलब्ध केले.
कंपनीने नोव्हेंबर 2019 च्या अखेरीस अल्ट्रोझचे उत्पादन सुरू केले होते. जानेवारी 2020 मध्ये कंपनीने ही कार लाँच केली होती.
अल्ट्रोझ ALFA (Agile Light Flexible Advanced) आर्किटेक्चर वर बनवलेले पहिलेच मॉडेल आहे. कारने चालू आर्थिक वर्षात प्रीमियम हॅचबॅक कॅटेगरीमध्ये दुसरे स्थान प्राप्त केले आहे. एका महिन्यात ह्या ब्रँडची सरासरी 6,000 युनिट्स विक्री होत आहे. यावर्षी मार्चमध्ये कारच्या 7,550 युनिट्सची विक्री झाली.
कंपनीने म्हटले की, “या आव्हानात्मक काळात आम्ही एक मोठा टप्पा पार केला आहे. 1,00,000 व्या युनिटची आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही आमच्या ग्राहक आणि पार्टनरच्या सतत पाठिंब्याबद्दल आणि निष्ठेबद्दल आभारी आहोत.”
टाटा मोटर्सचे राजन अंबा म्हणाले, “अल्ट्रोझ आमच्या नव्याने उपलब्ध झालेल्या वाहनांमध्ये प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट बाबत विविध पर्यायांची ऑफर देत आहे.”
ते म्हणाले, “अल्ट्रोझ सेफ्टी, डिझाईन, परफॉर्मन्स आणि अनुभव यांचे इंटरनॅशनल स्टँडर्ड स्थापित करते. “आज 1,00,000 व्या युनिटची उपलब्धता त्याचाच भाग आहे”.
अंबा म्हणाले, “भारतीय ग्राहकांकडून वाढती मागणी आणि वाढते मार्केट यामुळे आम्हाला विश्वास आहे की अल्ट्रोझ भविष्यात आणखी यशस्वी होइल.”
अल्ट्रोज 1.2L रेवोट्रॉन पेट्रोल, 1.2L i-Turbo पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिनसह सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, कार डार्क रेंजमध्ये देखील उपलब्ध आहे आणि सर्व प्रकारांमध्ये अनेक प्रीमियम फिचर्स ऑफर करते.
कारची एकूण किंमत 5.69 लाख ते 9.45 लाख रुपयांदरम्यान आहे. कारमध्ये 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एम्बियंट लायटिंग, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 4 एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रियर पार्किंग सेन्सर आणि स्पीड अॅलर्ट सिस्टम इतके फिचर्स असतील.
Comments are closed.