डेल्टा,डेल्टा प्लस येईन की नाही? माहित नाही, नविन IPO मात्र नक्की येणार

Paradeep Phosphates' IPO will comprise a fresh issue of shares worth ₹ 1,255 crore and an offer for sale of up to 12 crore shares by existing shareholders and promoters

नामांकित खत कंपनी प्रदीप फॉस्फेट्सला आयपीओद्वारे फंड गोळा करण्यासाठी सेबीची परवानगी मिळाली आहे.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, IPO मध्ये 1,255 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 12,00,35,800 शेअर्सची ऑफर (OFS) आहे.

OFS अंतर्गत, झुआरी मारॉक फॉस्फेट्स (ZMPPL) 75,46,800 पर्यंत शेअर्स ऑफर करतील आणि 11,24,89,000 पर्यंत इक्विटी शेअर्स भारत सरकार ऑफर करेल.

ऑगस्टमध्ये प्रदीप फॉस्फेट्सने सेबीकडे आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती. 22 सप्टेंबर रोजी सेबीने IPO साठी परवानगी दिली.

सध्या, कंपनीत ZMPPL चा 80.45 टक्के आणि भारत सरकारचा 19.55 टक्के हिस्सा आहे. गोव्यातील खत निर्मिती सुविधा, कर्ज आणि जनरल कॉर्पोरेट हेतूसाठी ही रक्कम वापरली जाईल.

प्रदीप फॉस्फेट प्रामुख्याने विविध कॉम्प्लेक्स खतांची निर्मिती, व्यापार, वितरण आणि विक्रीमध्ये स्थापित कंपनी आहे. त्यांची खते ‘जय किसान नवरत्न’ आणि ‘नवरत्न’ सारख्या ब्रँड अंतर्गत विकली जातात.

ॲक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेएम फायनान्शियल आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे या इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

Comments are closed.