ह्याला म्हणतात मंदीत संधी! व्हॉट्सॲप, इन्स्टा, एफबी बंद चा फायदा टेलिग्रामला
Telegram gains 70M new users in just one day after Facebook outage
टेलीग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी मंगळवारी सांगितले की, मेसेजिंग ॲप टेलीग्रामने सोमवारच्या फेसबुक आउटेज दरम्यान 70 मिलियनहून अधिक नवीन युजर्स मिळवले.
फेसबुक कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या बदलामुळे तब्बल 3.5 अब्ज युजर्सना व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर सारख्या ॲपवर अडचणी निर्माण झाल्या.
दुरोव यांनी आपल्या टेलीग्राम चॅनेलवर असे लिहिले कि, “टेलीग्रामचा दैनंदिन युजर्स वाढीचा दर आउटेज दरम्यान प्रमाणापेक्षा अधिक होता. एका दिवसात आमच्या प्लॅटफॉर्मवर 70 मिलियन युजर्स वाढले.
दुरोव म्हणाले की, अमेरिकेत काही युजर्सना अडचणीचा सामना करावा लागला. याचे कारण लाखो लोकांनी एकाच वेळी साइन अप केले हे होते. परंतु बहुसंख्य लोकांसाठी ॲप नेहमीप्रमाणे काम करत होते.
युरोपियन युनियनचे अँटीट्रस्ट प्रमुख मार्ग्रेथ वेस्टेगर यांनी सांगितले की, या आउटेजमुळे काही मोठ्या प्लेअरवर अवलंबून राहण्याचे परिणाम दिसून आले आणि यासाठी प्रतिस्पर्ध्यांची गरज अधोरेखित झाली.
रशियाने सांगितले की, या घटनेनंतर मॉस्कोला स्वतःचे इंटरनेट प्लॅटफॉर्म आणि सोशल नेटवर्क विकसित करणे गरजेचे आहे.
सोमवारी व्हॉट्सॲपच्या जवळजवळ सहा तासांच्या आउटेजमुळे क्रिप्टोकरन्सीपासून रशियन ऑईलपर्यंत मालमत् व्यापाराला फटका बसला, असे बाजाराच्या खेळाडूंनी सांगितले, तरी टेलीग्राम सारख्या पर्यायी प्लॅटफॉर्मवर बदल केल्याने गंभीर व्यत्यय मर्यादित झाला.
Comments are closed.