भारीच! ‘ह्या’ पाच बँका देऊ शकतात तुम्हाला जास्तीचा व्याज दर
These Five banks offer up to 7% interest on savings accounts
सेविंग अकाउंट असण्याचे अनेक फायदे आहेत. लिक्विडिटी, इंटरेस्ट मिळवणे, फंड सेफ्टी, सेवींग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट यांच्यातील ऑटो स्वीपमुळे फायदा इ. सुविधा सेविंग अकाउंटमुळे आपणास मिळतात. दरम्यान स्मॉल फायनान्स बँका आपल्याला अधिक व्याज दर देतात.
स्मॉल फायनान्स बँका ग्राहक वाढविण्यासाठीसाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सेविंग अकाउंटवर जास्त व्याज दर देत आहेत. तुम्ही लाँग टर्म ट्रॅक रेकॉर्ड, गूड सर्व्हिस स्टँडर्ड, लार्ज ब्रांच नेटवर्क आणि शहरांमध्ये एटीएम सेवा असलेली बँक निवडावी. बँकबाजारने जमा केलेल्या डेटानुसार सेविंग अकाउंटवर जास्त व्याज दर देणाऱ्या पहिल्या पाच बँका पुढीलप्रमाणे.
1) उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
बँक सेविंग अकाउंटवर 7 टक्के व्याज दर देते. स्मॉल फायनान्स बँकांमध्ये, या बँकेद्वारे सर्वात जास्त व्याज दर दिला जातो.
2) AU स्मॉल फायनान्स बँक
ही बँक सेविंग अकाउंटवर 7 टक्के व्याज दर देते. बँकेत 2,000 ते 5,000 रुपये मासिक शिल्लक असणे आवश्यक आहे.
3) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
ही बँक सेविंग अकाउंटवर 7 टक्के व्याज दर देत आहे.बँकेत 2,500 ते 5,000 रुपये मासिक शिल्लक असणे आवश्यक आहे.
4) DCB बँक
बँक सेविंग अकाउंटवर 6.75 टक्के व्याज दर देते .खाजगी बँकांमध्ये ही बँक सर्वोत्तम व्याज दर देते. बँकेत 2,500 ते 5,000 रुपये मासिक शिल्लक असणे आवश्यक आहे.
5) सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक सेविंग अकाउंटवर 6.25 टक्के व्याज दर देत आहे. येथे सरासरी मासिक शिल्लक 2,000 रुपये असणे आवश्यक आहे.
सर्व बीएसई लिस्टेड स्मॉल फायनान्स बँका आणि खाजगी बँकांच्या सेविंग अकाउंटवरील व्याज दर डेटा संकलनासाठी विचारात घेतले आहेत. बँकबझारने 15 सप्टेंबर 2021 पर्यंतचा डेटा संकलित केला आहे. ज्या बँकांच्या वेबसाइट्स डेटाची जाहिरात करत नाहीत त्यांचा येथे विचार केला गेलेला नाही.
Comments are closed.