परदेशात शिकायला जायचय? ह्या गोष्टींकडे लक्ष द्या
If you a student traveling abroad for higher education, you must pay attention to these things.
परदेशात उच्च शिक्षण घेण्याची अनेकांची इच्छा असते. आणि अनेकजण यासाठी प्रयत्न करत असतात, परंतू सध्या परदेशात शिकायला जायचं म्हणजे अनेक गोष्टीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी परदेशी प्रवास करायचा म्हणून लस घेऊन तयार आहेत. मात्र ज्या देशात शिकायला जायचे तिथे पोहोचल्यानंतर कदाचित तिसरा बूस्टर शॉट तुम्हाला घ्यावा लागू शकतो. हे नियम त्या त्या देशानुसार वेगळे आहेत. हे केल्यानंतरही काही गोष्टींकडे लक्ष दिलेच पाहिजे.
१. लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवा आणि विलगीकरणाचे नियम जाणून घ्या
शिकण्यासाठी परदेशात प्रवास करताना आपले लस प्रमाणपत्र सोबत ठेवा. को-विन वेबसाइटवरून ओळख पडताळणी म्हणून आपल्या पासपोर्टशी लस प्रमाणपत्र जोडले पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युरोपियन युनियनमधील १५ देश कोविशील्ड स्वीकारतात.पण जर तुम्ही अशा देशात जात असाल जिथे कोविशील्ड लसीला अद्याप मंजूर नाही तर तुम्हाला त्या देशात गेल्यानंतर विलगीकरणात जावे लागेल. अशा विद्यार्थ्यांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आदर पूनावाला यांनी एक खास फंड उभारला आहे. विलगीकरणात राहण्याचा विद्यार्थ्यांचा खर्च ते या फंडातून करणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. हे आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी विद्यार्थांनी SII च्या वेबसाइटवर अर्ज करणे बंधनकारक आहे.
जसजसे लसीकरण वाढते आहे, तसे काही देश विलगीकरणाचे नियम शिथिल करत आहेत. उदाहरणार्थ, अमेरिका आणि कॅनडा मध्ये, जर एखाद्या विद्यार्थ्याने भारतातून प्रवास केला असेल आणि त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर विलगीकरणाची आवश्यकता नाही. पण जर तुम्ही लस घेतली नसेल, मग तुम्हाला परदेशी देशाच्या नियमांनुसार अनिवार्य विलगीकरणात जाणे आवश्यक आहे. ते आता १४ दिवसांवरून ७ दिवसांपर्यंत कमी करण्यात आले आहे. काही विद्यापीठे विलगीकरणाचा संपूर्ण खर्च किंवा त्याच्या ५० टक्के खर्च करत आहेत. उदाहरणार्थ, यूके आणि ऑस्ट्रेलियातील अव्वल विद्यापीठे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विलगीकरणाचा संपूर्ण खर्च उचलतील.
२. भारतात फॉरेक्स खरेदी करा
परदेशात शिक्षणासाठी प्रवास करताना तुम्ही सोबत नेत असलेल्या रकमेपैकी ३०-४०% रक्कम कॅशच्या स्वरूपात असूद्यात. परक्या देशात गेल्यावर तिथे तातडीने करायचे खर्च जसे की जेवण, कॅब यासाठी तुमच्याकडे कॅश असणे गरजेचे आहे. उरलेली रक्कम तुम्ही प्रीपेड फॉरेक्स कार्डवर लोड केले पाहिजेत. अभ्यासासाठी प्रवास करणारे बरेच विद्यार्थी यासाठी खर्चाचे नियोजन करतात. हे फॉरेक्स कार्ड घेताना त्याची मार्क अप फी किती आहे याकडेही लक्ष द्या. बऱ्याचदा काही फॉरेक्स कार्ड कंपन्या ३-४% एवढी जास्त मार्क अप फी तुमच्याकडून घेतात.
परदेशात जाण्याआधी भारतातच फॉरेक्स खरेदी करा. बाहेरच्या देशातील एअरपोर्टवर किंवा बँकेत फॉरेक्स खरेदी करणे जास्त महाग पडू शकत.
३. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणे टाळा.
जेव्हा तुम्ही भारतात स्वाइप करता तेव्हा क्रेडिट आणि डेबिट कार्ड सोयीस्कर वाटतात. पण हेच जर तुम्ही परदेशात स्वाईप केले तर ते बरेच महाग ठरू शकते. परदेशात केलेल्या प्रत्येक स्वाइपसाठी, बँका तुम्हाला फॉरेन करन्सी कन्व्हर्जन फी (प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी ३-३.५% पर्यंत) आणि फॉरेन ट्रान्झॅक्शन चार्ज (सुमारे २.५-३.५% प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी) आकारते.
तर जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून परदेशातील एटीएममधून पैसे काढता, तेव्हा तुम्हाला बँकेतून पैसे काढण्याचे शुल्क (काढलेल्या रकमेच्या १ ते ४%) भरावे लागते.
४. डेबिट किंवा क्रेडिट कार्डऐवजी फॉरेक्स कार्ड खरेदी करा
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बरोबर नेण्याऐवजी प्रीपेड फॉरेक्स कार्ड वापराने कधीही उत्तमच. कारण यामध्ये फॉरेक्स कन्व्हर्जन चार्जेस लागत नाहीत. याचे कारण असे आहे की तुम्ही भारत सोडून जाण्याआधी तुमचे चलन आधीच कन्व्हर्ट केलेले असते आणि तुमच्या कार्डवर लोड केले असते. म्हणून, प्रत्येक वेळी तुम्ही परदेशात खर्च करता तेव्हा तुम्ही परकीय चलन खर्च करता. तुम्ही परदेशात असता तेव्हा तुमच्या पालकांकडून फॉरेक्स कार्ड सहजपणे टॉप अप होऊ शकतात. हे कार्ड पिनसह सुरक्षित असतात.
नवीन फॉरेक्स कार्ड खरेदी करताना व्हिसा कार्डच घ्या. मास्टरकार्डवर २२ जुलै पासून रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध घातले आहेत.
५. बँकेत स्टुडंट अकाऊंट सुरु करा
अशी काही विद्यापीठे आहेत जी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून विमा खरेदी करण्यास सांगतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला जे काही ऑफर केले जात आहे ते स्वीकारण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. परदेशी विद्यापीठांनी पुरवलेल्या विमा संरक्षणांचे प्रीमियम महामारीमुळे गेल्या एका वर्षात वाढले आहेत. परदेशी विमा कंपन्यांनी दिलेल्या दरांच्या तुलनेत भारतीय विमा कंपन्यांकडून आकारले जाणारे प्रीमियम लक्षणीय कमी आहे. पण जर तुमची पॉलिसी विद्यापीठाने ठरवलेल्या आवश्यकतांची पूर्तता करत नसेल, तर तुम्हाला उद्भवणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे हे करताना काळजी घेऊन, संपूर्ण माहिती घेऊन मगच पॉलिसी विकत घ्या.
Comments are closed.