‘बिग बुल’ ची गुंतवणूक आता कॅनरा बँकेतही!

The 'Big Bull of India' has acquired a 1.59 per cent stake in Canara Bank during April to June 2021 quarter.

शेअर बाजारातील गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड आणि इतर संस्था, ज्या व्हॅल्यूपीक साठी राकेश झुनझुनवाला यांना फॉलो करतात, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. झुनझुनवाला यांनी एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत कॅनरा बँकेत १.५९% टक्के हिस्सा विकत घेतला आहे. बँकेने नुकतीच आपल्या शेअरहोल्डिंग पॅटर्नची माहिती बीएसईकडे जाहीर केली. त्यावरून झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीला दुजोरा मिळाला. या कंपनीचा शेअहोल्डींग पॅटर्न बीएसईची अधिकृत वेबसाइट bseindia.com वर उपलब्ध आहे.

राकेश झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेतील शेअरहोल्डिंग-
एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीतील कॅनरा बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, बिग बुलने २,८८,५०,००० शेअर्स खरेदी केले आहेत, जे कॅनरा बँकेच्या एकूण शेअरच्या १.५९% आहे. कॅनरा बँक ही तिसरी कंपनी आहे ज्यात राकेश झुनझुनवाला यांनी एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत गुंतवणूक केली आहे. याअगोदर त्यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ( SAIL) आणि इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये शेअर खरेदी केले होते.

या बातमीमुळे मंगळवारी कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये २% ची वाढ झालेली दिसून आली होती. गेल्या एक महिन्यात कॅनरा बँकेच्या शेअरच्या किमती ६. ३१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कॅनरा बँकेत एलआयसीचा सुद्धा ८.११% स्टेक आहे.

Comments are closed.