टॉप IT कंपन्या करणार मोठी भरती, तब्बल ‘ इतके ‘ फ्रेशर केले जाणार हायर

India's IT Big Four to hire 1.6 lakh freshers in FY22

टीसीएस , इन्फोसिस , विप्रो आणि एचसीएल टेक या टॉप चार भारतीय आयटी कंपन्यांनी 2021-22 साठी त्यांच्या फ्रेशर्स हायरिंगचे लक्ष्य दुप्पट करून 1.6 लाख केले आहे. वाढत्या डिजिटलिझेशन पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सदर IT कंपन्यांनी आर्थिक वर्ष 21 मध्ये सुमारे 82,000 फ्रेशर्सची हायरिंग केली होती आणि सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत नविन 53,964 कर्मचारी हायर केलते, जे एक वर्षापूर्वी 17,076 होते.

जगभरातील अनेक उद्योगांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दिशेने पाऊल टाकले आहे, यामुळे तंत्रज्ञान यापुढेही वाढतच राहिल.

उदाहरणार्थ, एविएशन आणि हॉस्पिटॅलिटी, ह्या दोन क्षेत्रांना कोविडचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. यामुळे आता हे व्यवसाय देखील काँटॅक्टलेस गोष्टीत गुंतवणूक करत आहेत. अनेक उद्योग आता व्यवसाय चालविण्यासाठी आयटीमध्ये गुंतवणूक करत आहेत.

सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांनी म्हटले होते की, असे वातावरण म्हणजे ” दशकात एकदा संधी” अस आहे. आयटी कंपन्यांनी, टप्प्याटप्प्याने, त्यांच्या दृष्टीकोनात सुधारणा केली आहे आणि त्या वाढीकडे जात आहेत.

या सर्वांनी क्लाउड आर्किटेक्चर, सायबर सेक्युरीटी, फुल स्टॅक डेव्हलपमेंट आणि एआय/एमएल स्किल यावर लक्ष केंद्रित केले आहे.

टीसीएसचा अट्रिशन रेट गेल्या तिमाहीत 8.6 टक्क्यांवरून 11.9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विप्रो आणि इन्फोसिसने 20 टक्के आणि एचसीएल टेक 15.7 टक्क्यांहून जास्त वाढ नोंदवली आहे. मागील तिमाहीत, या तीन आयटी कंपन्यांसाठी अट्रिशन 10-15 टक्के होते.

विप्रोचे सीईओ आणि एमडी थियरी डेलापोर्टे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, “आपण मोठ्या प्रमाणावर प्रतिभा असलेले कर्मचारी हायर केले पाहिजेत.”

टीसीएसचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी मिलिंद लकड यांनी म्हटले आहे की, पुढील दोन-तीन तिमाहीपर्यंत हे अट्रिशन कायम राहील.

फ्रेशर्सची नियुक्ती ही अट्रिशन आणि वाढत्या मागणीचा सामना करण्यासाठी एक उपाय म्हणून पुढे आली आहे. डेलापोर्टे म्हणाले, ” मला हे सांगताना आनंद होत आहे की,आम्ही पुढील आर्थिक वर्षात 25,000 हून अधिक फ्रेशर्स आमच्यासोबत जोडण्यास तयार आहोत.”

टीसीएसने या वर्षी 40,000 ऐवजी 78,000 फ्रेशर्स साइन अप करण्याची योजना आखली आहे. यात आधीच 43,000 फ्रेशर्स ऑन-बोर्ड झाले आहेत. विप्रो आणि इन्फोसिसने आर्थिक वर्ष 22 साठी त्यांच्या हायरिंगचे लक्ष्य अनुक्रमे 17,000 आणि 45,000 केले आहे. HCL टेकने 22,000 फ्रेशर्स घेण्याची योजना आखली.

विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, “आम्ही मागणी आणि पुरवठा यांचा विचार करुन अधिक फ्रेशर जोडण्याचा प्रयत्न करत आहोत.

विप्रो आणि एचसीएल टेक मधील कर्मचाऱ्याची पगारवाढ 1 जुलैपासून लागू झाली आणि टीसीएसने 1 एप्रिल 2021 पासून वेतनवाढ लागू केली.

एचसीएल टेक बोर्डाने कंपेसेशनचा एक भाग म्हणून रेस्ट्रीक्टेड स्टॉक युनिट (आरएसयू)मंजूर केले आहे, जे कंपनीच्या दीर्घकालीन प्रोत्साहन योजनेचा एक भाग आहे.

Comments are closed.