गूगल पे नाही तर ‘ ही ‘ पेमेंट फर्म घेतेय भरारी, 2021 मध्ये कमावला भरपूर रेव्हेन्यू

The company saw a jump in revenue owing to a significant rise in transactions on the platform as it became the largest player in UPI payments in FY21.

डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस लीडर फोनपे ने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021 या आर्थिक वर्षात एकूण तोट्यात 44 टक्क्यांची घट नोंदवली आहे. एम्प्लॉय स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईएसओपी) वगळता, ऑपरेशनल लॉस, आर्थिक वर्ष 2021 मध्ये 888 कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये 1,570 कोटी रुपये होता, असे कंपनीने सांगीतले.

ऑपरेशनल कॉस्टमध्ये घट तसेच महसुलात लक्षणीय वाढ झाल्यामुळे कंपनीचे नुकसान कमी झाले आहे.कंपनीचा एकूण महसूल FY20 मध्ये 372 कोटी रुपयांवरून FY21 मध्ये 690 कोटी रुपयांवर गेला.

कंपनीने युनायटेड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि भारत बिल पेमेंट सिस्टीम (बीबीपीएस) वर व्हॉल्यूमचा प्रादुर्भाव गाजवल्यामुळे प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांमध्ये 85 टक्के वार्षिक वाढ झाली.

एकूण मार्जिन 60 टक्क्यांवरून 84 टक्के (YoY) पर्यंत वाढले. कंपनीने कर्मचाऱ्यांना आतापर्यंतचे सर्वाधिक ESOP 843 कोटी रुपये जारी केले, जे आर्थिक वर्ष 206 मध्ये 206 कोटी रुपये होते.

कंपनीचे टॅक्स आणि ईएसओपी खर्चासह एकूण नुकसान 1,728 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 20 मध्ये 1,772 कोटी होते.

कंपनीने वर्षभरात एकूण 2,455 कोटी रुपये खर्च केले, जे मागील आर्थिक वर्षातील 2,202 कोटी रुपयांच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढले. कंपनीचे एकूण उत्पन्न सुमारे 70 टक्क्यांनी वाढून 427 कोटी रुपयांवरून 725 कोटी रुपये झाले.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने BBPS वर ऑगस्टसाठी शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, फोनपे 49 टक्के वॉल्यूम शेअरसह मार्केटमध्ये आघाडीवर आहे.

कोविडमुळे आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन दरम्यान ग्राहक ऑनलाईन पेमेंटकडे वळल्याने FY21 मध्ये डिजिटल व्यवहार देखील वाढले. फोनपे या काळात युजर्समध्ये एक पसंतीचे व्यासपीठ बनले आणि डिसेंबर 2020 मध्ये गूगल पे ला मागे टाकत UPI पेमेंटमध्ये मार्केट लीडर बनले. या वर्षी मार्चमध्ये, फोनपे एका महिन्यामध्ये व्यवहारात 1अब्ज डॉलर ओलांडणारा पहिला UPI प्लेअर बनला.

Comments are closed.