आशिष कचोलिया आणि ‘ हा ‘ मल्टीबॅगर स्टॉक, वाचा सविस्तर

Ashish Kacholia buys stake in multibagger stock

मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जाणारे, गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील ट्रेडर आशिष कचोलिया यांनी सप्टेंबर 2021च्या ह्या तिमाहीत व्हीनस रेमेडीजला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये घेतले आहे. व्हीनस रेमेडीज हा स्टॉक 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे आणि सदर स्टॉकने तब्बल 150 टक्के परतावा दिला आहे, जो NSE वर 165 रू वरून सध्या 414 रू वर आहे.

जुलै ते सप्टेंबर 2021 च्या तिमाहीसाठी व्हीनस रेमेडीजच्या BSE शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्याकडे 1.50 लाख शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या भांडवलाच्या 1.12 टक्के आहेत. जून 2021 मध्ये कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये, आशिष कचोलिया यांचे नाव वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या यादीत नव्हते, याचा अर्थ आशिष कचोलिया यांनी जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीत हे शेअर्स खरेदी केले आहेत.

व्हीनस रेमेडीज शेअरचा इतिहास

व्हीनस रेमेडीज ही एक फार्मा कंपनी आहे, जीच्या शेअर्सची किंमत 2021 मध्ये 165.15 रू वरून 414.05 रू पर्यंत वाढली. ज्यातून स्टेकहोल्डरना सुमारे 150 टक्के परतावा मिळाला.एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 130.15 रू वरून 414.05 रू.वर गेला.

दरम्यान, आशिष कचोलिया यांनी इतर काही मल्टीबॅगर स्टेकमध्येही स्टॉक खरेदी केला आहे. आशिष कचोलिया पोर्टफोलिओमधील या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गेटवे डिस्ट्रीपार्क्स आणि सोमानी होम इनोव्हेशनचा समावेश आहे. या स्टॉकनी देखील 2021 मध्ये त्यांच्या संबंधित स्टेकहोल्डर ना मल्टीबॅगर परतावा देखील दिला आहे. गेटवे डिस्ट्रीपार्क्सचे शेअर्स वर्षभरात आजपर्यंत सुमारे 140 टक्क्यांनी वाढले आहेत तर सोमानी होम इनोव्हेशनच्या शेअरची किंमत 2021 मध्ये 165 टक्क्यांच्या जवळपास वाढली आहे.

Comments are closed.