भारीच की! तब्बल ‘ इतक्या ‘ फ्रेशर साठी आयटी कंपन्यांनी आणल्या जॉबच्या संधी

Top 4 IT companies recruit record 1 lakh employees in April

भारतातील चार सर्वात मोठ्या आयटी कंपन्यानी ( टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल) ह्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, त्यांच्या एकत्रित कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाखांनी वाढवली आहे. ही संख्या मागील वर्षापेक्षा 13 पट अधिक आहे.

आयटी सेवांमध्ये वाढती मागणी याचे हे उदाहरण आहे. जगभरातील अनेक प्रोजेक्ट टिकाऊपणासाठी त्यांचे कामकाज डिजिटल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भविष्यात डिजिटल युग अवतरण्याची ही खूप मोठी संधी आहे.

टीसीएस, कंपनीमध्ये 5.2 लाख कर्मचारी आहेत. कंपन्यांकडून काही नियुक्त्या हाई अट्रिशन रेटशी संबंधित असतात. गेल्या तिमाहीत इन्फोसिसचे ॲट्रिशन 13.9% वरून 20.1% वर पोहोचले आहे. इतर कंपन्यांनीही ॲट्रिशन रेट वाढल्याचे पाहिले आहे.

टीसीएसने म्हटले की, या वर्षी 75,000 फ्रेशर्सना ऑफर देण्याची त्यांची योजना आहे, जी कंपनीसाठी एक विक्रमी उलाढाल असेल.

मागच्या आठवड्यात इन्फोसिसने दुसऱ्यांदा वर्षासाठी आपले महसूल मार्गदर्शन वाढवले, मागणी किती वेगाने वाढत आहे याचे हे संकेत आहे. कंपनीने या वर्षासाठी फ्रेशर हायर करण्याचे प्रमाण 45,000 वर नेले आहे.

विप्रोचे सीईओ थियरी डेलापोर्ट म्हणाले की, सध्या मागणी भरपूर आहे, यामुळे नविन हायरिंगला वाव आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीचे सीईओ सी विजयकुमारते म्हणाले, “आम्ही गेल्या तिमाहीत सर्वाधिक 11,153 हायरिंग केली होती . गेल्या तीन तिमाहीत एकूण हायरिंग 28,000 इतकी होती.

Comments are closed.