वाढ सुरूच! सलग तिसऱ्या दिवस वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

Petrol, diesel prices hiked for third consecutive day

देशभरात शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 0.35 रुपयांनी वाढून 105.49 रुपये प्रति लीटर आणि 94.22 रुपये प्रति लीटर झाले. दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर 0.35 रुपयांनी वाढवण्यात आले.

मुंबईत पेट्रोलचे दर 0.34 रुपयांनी वाढून 111.43 रुपये झाले, तर डिझेलचे दर 0.37 रुपयांनी वाढून 102.15 रुपये झाले.

कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 106.10 रुपये आणि 97.33 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 102.70 रुपये आणि 98.59 रुपये प्रति लीटर आहे.

तेल कंपन्यांनी एका आठवड्यापूर्वी ऑटो इंधनाच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली होती. 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी किंमतींवर स्थिर होत्या. त्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढवण्यात आले आहेत.

Comments are closed.