TVS मोटारची युरोप मध्ये एंट्री, घेतले ‘ह्या’ कंपनीचे स्टेक विकत

TVS picked up 80% stake in EGO for $17.9 million

दक्षिण भारतातील TVS मोटर कंपनीने स्वित्झर्लंड येथील ई-बाइक निर्माती EGO मुव्हमेंटला आपल्या ताफ्यात घेतले आहे. कंपनीने 23.5 अब्ज डॉलरसह वेगात वाढणाऱ्या ई-बाइक बिजनेस मध्ये प्रवेश केला आहे.

युरोपियन खंडात ई-बाइकच्या वाढत्या मागणीमुळे पुढील तीन ते पाच वर्षांत 100-150 मिलियन डॉलर्सची कमाई करण्याचे कंपनीचे लक्ष आहे. TVS मोटरने EGO मध्ये 17.9 मिलियन डॉलर खर्च करुन 80% स्टेक विकत घेतला आहे.

TVS मोटर कंपनीचे एमडी सुदर्शन वेणू म्हणाले की, ईजीओ मूव्हमेंट सोबतची पार्टनरशिप इलेक्ट्रिक क्षेत्रात कंपनीच्या वाढीस चालना देईल.

“आम्ही युनिक ब्रँड्स स्केलद्वारे स्टेटर्गिक ई मोबिलिटी इकोसिस्टम तयार करत आहोत, ज्याद्वारे अत्याधुनिक, महत्वाकांक्षी उत्पादनांद्वारे ग्राहक आकर्षित होतील. EGO मूव्हमेंटची ग्राहक-केंद्रित उत्पादने,युरोपमध्ये मजबूत स्थिती ही वैशिष्ट्ये आहेत.

EGO मूव्हमेंट ही एक फायदेशीर कंपनी आहे, जीने 2020 मध्ये सुमारे 3500 युनिट्सची विक्री करून 6 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. टीव्हीएसला एका वर्षात हेच उत्पन्न 10-12 मिलियन डॉलर करायच आहे.

कंपनीस 2025 पर्यंत एकूण स्टोअर्सची संख्या 32 पर्यंत करायची आहे. जी सध्या 5 स्टोअर्स एवढी आहे. भारतीय बाजारपेठेत देखील विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे, परंतु त्यासाठी वेळापत्रक निश्चित केले गेलेले नाही.

सुदर्शन म्हणाले की, हे सेगमेंट भविष्यात भरपूर वाढीसाठी सज्ज आहे. येत्या पाच वर्षात आम्ही भारतात 30 अब्ज डॉलर आणि युरोपमध्ये 7 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

TVS ने गेल्या वर्षी नॉर्टन मोटारसायकल ची खरेदी केल्यावर, युरोपमध्ये TVS मोटरची उपस्थिती आणखी वाढली आहे.

डॅनियल मेयर आणि मेरी सो यांच्या नेतृत्वाखाली, EGO मूव्हमेंट स्विस टेक कंपनी आहे जी ई-बाइक, ई-कार्गो बाईक आणि ई-स्कूटरच्या पुरवते.

TVS मोटरचा दावा आहे की, EGO मूव्हमेंटने ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसह अनोखे डिझाईन्स तयार केले आहेत.त्यांचे संपूर्ण स्वित्झर्लंड, लिकटेंस्टाईन आणि जर्मनीमध्ये एक ऑम्निचॅनेल नेटवर्क आहे.

Comments are closed.