विस्तारा आणि इंडसइंड बँक यांच्यात क्रेडिट कार्ड डील जाहीर, सर्व्हिस बाबत ‘ही’ माहिती
Vistara partners with IndusInd Bank to launch co-branded credit card
इंडसइंड बँकेने 27 सप्टेंबर रोजी जाहीर केले की, त्यांनी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी विस्तारा या विमान कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे.
बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘क्लब विस्तारा इंडसइंड बँक एक्सप्लोरर’ क्रेडिट कार्ड, हे नवीन क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी तयार केले आहे. जे ग्राहकांना ‘ऑन द गो’ साठी आवडेल.
बँकेने म्हटले आहे की, ते कार्डधारकाना क्लब विस्तारा (सीव्ही), नियमित ग्राहकांना ‘गोल्ड’ क्लास मधील सदस्यत्व प्रदान करतील. आंतरराष्ट्रीय प्रवासाद्वारे ग्राहक सीव्ही पॉइंट देखील कमवू शकतात.
बँकेने सांगितले की, कार्ड जगभरातील 600 हून अधिक विमानतळावर झीरो फोरजिन करन्सीवर चालेन.
इंडसइंड बँकेच्या सौमित्र सेन यांनी सांगितल की, “जगात हळूहळू सर्व खुले होत असताना, भारतीय व्यवसाय आणि आनंद या दोन्ही गोष्टींसाठी प्रवास करतील आणि प्रवासादरम्यान त्यांना चांगला पर्याय देणे सध्या गरजेचे बनले आहे.
विस्ताराचे विनोद कन्नन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “आम्ही इंडसइंड बँकेसोबत भागीदारी करून आमच्या ग्राहकांना एक समाधान देऊ इच्छितो. याव्दारे विस्तारा ग्राहकांना सर्व सोयसुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
Comments are closed.