कशी पहाल पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजची शेअर अलॉटमेंट 

Allotment status can be checked on BSE website or IPO registrar's website

मंगळवार 28 सप्टेंबर रोजी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजचे IPO द्वारे शेअर अलॉटमेंट अंतिम केले जाईल.

अलॉटमेंट स्टेटस कसे पहावे?

गुंतवणूकदार शेअर अलॉटमेंट  बीएसईच्या वेबसाइटवर किंवा आयपीओ रजिस्ट्ररच्या वेबसाइटवर तपासू शकतात.

बीएसई वेबसाइटवर , गुंतवणूकदारांनी हे करावे.

1) इश्यू टाईप ‘इक्विटी’ निवडा आणि इश्यू नेम ‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ निवडा.
2) अर्ज क्रमांक आणि पॅन क्रमांक टाका.
3) शेवटी ‘I’m not a Robot’ बॉक्सवर क्लिक करा आणि सर्च वर क्लिक करा.

अलॉटमेंट आयपीओ रजिस्ट्ररच्या वेबसाइटवर देखील बघू शकता.
1) पॅन, अर्ज क्रमांक किंवा डीपी क्लायंट आयडी निवडा.
2) ‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आयपीओ’ निवडा.
3) पॅन, अर्ज क्रमांक किंवा डीपी क्लायंट आयडी टाका.
4) सर्च बटणावर क्लिक करा.

शेअर्सचे अलॉटमेंट न झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या बँक खात्यात 29 सप्टेंबरपर्यंत रिफंड मिळेल, तर अलॉटमेंट झालेल्यांना त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शेअर्स मिळतील.प्रॉस्पेक्टसमध्ये उपलब्ध वेळापत्रकानुसार 1 ऑक्टोबरपासून ट्रेडिंग सुरू होईल.

ग्रे मार्केट

आयपीओ वॉच आणि आयपीओ सेंट्रल आकडेवारीनुसार, पारस डिफेन्सचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 420-445 रुपयांवर उपलब्ध होते. जे अंतिम इश्यू किमतीच्या 140-154 टक्के जास्त आहेत. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत प्लॅटफॉर्म आहे जेथे IPO प्राइस बँड घोषणेच्या वेळी शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू होते. ते शेअर्सच्या लिस्टिंगपर्यंत चालू राहते.पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज संरक्षण क्षेत्रातील उत्पादने तयार करते.170.77 कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूचे 21-23 सप्टेंबर दरम्यान 304.26 पट सबस्क्रिप्शन झाले.गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या राखीव भागाच्या 927.70 पट बोली लावली.पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ठेवलेला भाग 169.65 वेळा सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी ठेवलेला भाग 112.81 वेळा खरेदी केला आहे.

Comments are closed.