येस बँक 10000 कोटींचा फंड उभारण्याच्या तयारीत,असा असेल प्लॅन

येस बँकेच्या बोर्डाने 21 डिसेंबर रोजी 10,000 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. सदर माहिती बँकेने आपल्या फायलिंगमध्ये दिली.

येस बँकेच्या बोर्डाने 21 डिसेंबर रोजी 10,000 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. सदर माहिती बँकेने आपल्या फायलिंगमध्ये दिली.

फायलिंगमध्ये फर्मने म्हटले आहे की “येस बँकेच्या संचालक मंडळाने 21 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत, इतर गोष्टींबरोबरच, इक्विटी शेअर्स/डिपॉझिटरी पावत्या/ बाँड्स/डिबेंचर्स/वारंट्स/ द्वारे निधी उभारण्याचा विचार केला आणि सदर ठराव मंजूर केला.

बँकेने ने नियामक फाइलिंगमध्ये सांगीतले केले आहे की, या अनुषंगाने, YES बँक त्याच्या स्टेकहोल्डरकडून सदर ठरावाबाबत मंजूरी घेणार आहे. यात 28 फेब्रुवारी 2022 रोजी कालबाह्य होणार्‍या वर्तमान स्टेकहोल्डरच्या मान्यतेवर मुदतवाढ होण्याची शक्यता देखील आहे.

येस बँकेच्या बोर्डाने जून 2021 मध्ये लोन सिक्युरिटीज जारी करून आणखी 10,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली होती.

Comments are closed.