आता ‘ह्या’ दोन मनोरंजन विश्वातील कंपन्या येणार एकत्र, मोठा धमाका करण्याची शक्यता

Zee Entertainment will hold 47.07 per cent, while Sony India will hold a majority stake of 52.93 per cent in the merged company

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने सांगितले की, त्यांच्या बोर्डने कंपनीचे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) मध्ये विलीनीकरण मंजूर केले आहे. दक्षिण आशियातील एक प्रमुख मनोरंजन कंपनी म्हणून वाढ करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

“एसपीएनआयचे स्टेकहोल्डर विलीन झालेल्या संस्थेमध्ये बहुसंख्य स्टेक होल्ड करतील. विलीनीकरणानंतर, एसपीएनआयच्या शेअरहोल्डरकडे एकत्रित 52.93 टक्के स्टेक असेल आणि झीच्या शेअरहोल्डरकडे 47.07 टक्के स्टेक असेल. पुनित गोयंका विलीन झालेल्या संस्थेचे एमडी आणि सीईओ म्हणून काम करतील. तर बोर्डवर बहुसंख्य संचालक हे सोनी समूहाचे असतील.

22 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत झी संचालक मंडळाने कंपनी आणि सोनी इंडियाच्या विलीनीकरणाच्या संयुक्त योजना आणि वाढीच्या भांडवलाचा समावेश करण्याच्या संभाव्य व्यवहारासंदर्भात एसपीएनआय सह नॉन-बाइंडिंग टर्म शीटच्या अंमलबजावणीस मान्यता दिली.

व्यवहाराचा एक भाग म्हणून, झी आणि एसपीएनआय त्यांचे लिनियर नेटवर्क, डिजिटल ॲसेट, प्रोडक्ट ऑपरेशन आणि प्रोग्राम लायब्ररी एकत्र करतील.

टर्म शीटनुसार, झीचे प्रमोटर सध्याच्या 4 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत आपली शेअरहोल्डिंग वाढवण्यास तयार आहेत.

झी एंटरटेन्मेंटचे चेअरमन आर गोपालन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “झील एक मजबूत वाटचाल करत आहे आणि या विलीनीकरणामुळे झीलला आणखी फायदा होईल असा बोर्डचा ठाम विश्वास आहे.” “विलीन झालेल्या घटकाचे मूल्य आणि दोन्ही समूहांमध्ये निर्माण झालेल्या अफाट समन्वयाने केवळ व्यवसाय वाढीस चालना मिळणार नाही तर भविष्यातील यशाचा स्टेकहोल्डरना फायदा होईल.

कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डर इन्वेस्को डेव्हलपिंग मार्केट्स फंड आणि ओएफआय ग्लोबल चायना फंडला काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर गोयंका यांच्या अध्यक्षतेखालील ऑडिट कमिटीच्या भूमिकेबद्दल प्रॉक्सी ॲडव्हायझरी फर्म इनगव्हर्नने चिंता व्यक्त केली होती.

अशोक कुरियन आणि मनीष चोखानी यांच्या जागी 17 मार्च 2021 पासून गोयांका यांना ऑडिट कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ज्यांनी 14 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला.

Comments are closed.