डिमॅटच्या दुनियेचा राजा – CDSL

प्रत्येक इन्व्हेस्टरचा डिमॅट अकाउंट उघडतांना सीडीएसएल किंवा एनएसडीएल या डिपॉझिटरी कंपन्यांशी संबंध येतोच. डिमॅट अकाउंट हे फक्त शेअर्स घेण्याचे आणि विकण्याचे एक माध्यम आहे इन्व्हेस्टर्सचे शेअर्स हे मात्र या दोन्ही मधून एका डिपॉझिटरी कंपनी कडे असतात. या दोन्ही कंपन्यांपैकी सीडीएसएल कडे ५९९ डिपॉझिटरी सहभागी आहेत तर एनएसडीएल कडे २७८ आहेत. या दोन्ही कंपन्या सेबी च्या नियंत्रणाखाली काम करत असल्या तरी शेअर मार्केट मध्ये फक्त सीडीएसएल ही एकच कंपनी लिस्टेड आहे.

CDSL बद्दल थोडे –

१९९९ साली स्थापन झालेल्या या कंपनीने २०१७ साली आपला आयपीओ आणला आणि लिस्टिंगलाच कंपनीने ८०% परतावा देत सर्वांचे लक्ष वेधले. एकमेव लिस्टेड डिपॉझिटरी कंपनी असल्याचा फायदा जरी कंपनीला झाला असला तरी पण लिस्टिंग गेन मागे त्यांचा वाढता बिझनेस हे सुद्धा एक प्रमुख कारण होते. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा तब्बल ५६% आहे जो आणखी वाढू शकतो.

कंपनीचे उत्पन्नाचे स्त्रोत –

कंपनीला डिमॅट अकाउंट मधील ई-केवायसी, ट्रांसॅक्शन शुल्क, वार्षिक शुल्क यातून तसेच आयपीओच्या लिस्टिंग मधून प्रामुख्याने उत्पन्न मिळते.

मागील १ वर्षात वाढत असलेली डिमॅट अकाउंटची संख्या आणि येणाऱ्या काळात वाढत चाललेली आयपीओची यामुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे.

अलीकडेच एप्रिल २०२१ ला आलेल्या आकडेवारीनुसार सीडीएसएल ही ३ करोड पेक्षा जास्त ॲक्टिव अकाउंट असलेली पहिली डिपॉझिटरी कंपनी ठरली आहे. त्यामुळेच कंपनीच्या शेअरने सुद्धा ऑल टाइम हायचा टप्पा याच महिन्यात पार केला.

कंपनीची आर्थिक स्थिती –

कंपनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याने कंपनी पूर्णपणे डेट फ्री आहे. कंपनीचा खर्च मर्यादित असल्याने बिझनेस वाढीबरोबरच कंपनीचा फायदासुद्धा वाढत जातोय. कंपनीने मागील ५ वर्षात आपली मालमत्ता आणि गुंतवणूकसुद्धा दुपटीने वाढवली आहे.

मागील ३ वर्षाचा कंपनीचा बिझनेस खालील प्रमाणे –

मार्च २०२०

एकूण उत्पन्न – २२६ कोटी

एकूण नफा – १०४ कोटी

मार्च २०१९

एकूण उत्पन्न – २४५ कोटी

एकूण नफा – ११५ कोटी

मार्च २०१८

एकूण उत्पन्न – २८४ कोटी

एकूण नफा – १०७ कोटी

कंपनीचे स्टेकहोल्डर्स –

बीएसई – २०%

एफपीआय – ८.०२%

डीआयआय- ३३.९४%

लॉकडाऊन पासून वाढत्या डिमॅट अकाउंटची संख्या आणि कंपनीचा वाढता बिझनेस पाहूनच एफपीआयने मागील ६ महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक अनेक पटीने वाढवली आहे.

२०२० च्या जून महिन्यात एफपीआय कडे कंपनीचे केवळ १.५१% स्टेक्स होते तेच मार्च २०२१ ला तब्बल ८.०२% झाले आहेत. यावरून या एफपीआयज ना कंपनीवर असलेला विश्वास दिसून येतो.

या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल ५२% नी वाढला आहे तर नफ्यामध्ये तब्बल ८०% ची वाढ झाली आहे.  पूर्ण वर्षाचा विचार केल्यास महसूल ४०% ने तर नफा ९०% ने वाढला आहे. कंपनीच्या ऍसेट्समध्ये १००% ने वाढ झाली आहे. कंपनीने ९ रुपये प्रति शेअर एवढा डिव्हीडंडसुद्धा जाहीर केला आहे.

एकूणच कंपनीची आर्थिक स्थिती, बिझनेस आणि भविष्यात आणखी वाढणारे डिमॅट अकाउंट पाहता कंपनी येत्या काळात आणखी चांगली कामगिरी करायची शक्यता आहे.

 

Comments are closed.