बिर्ला विस्ताराच्या दिशेने! वाढवणार उत्पादन क्षमता, ‘अशी’ केली तयारी
The increase is a new target set by the company, which had earlier said it would raise production to 25 mt by 2025
बिर्ला कॉर्पोरेशन 2027 पर्यंत आपली वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता 30 मिलियन टनापर्यंत (MT) वाढवणार आहे.
बुधवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्टेकहोल्डरना संबोधित करताना बिर्ला समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन लोढा म्हणाले, “2027 पर्यंत 30mt चे लक्ष्य गाठण्याच्या योजना सुरू आहेत,” ते म्हणाले की योजनांचे तपशील लवकरच जाहीर केले जातील. दरम्यान संचालक मंडळाने ते मंजूर देखील केले आहेत.
30 mt पर्यंत वाढ हे कंपनीने ठरवलेले नवीन लक्ष्य आहे. यापूर्वी कंपनीने 2025 पर्यंत आपली उत्पादन क्षमता 25 mt पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे.
बिर्ला कॉर्पोरेशनची सध्याची उत्पादन क्षमता 15.6 मीट्रिक टन आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस जवळजवळ 20 mt पर्यंत जाईल.
गेल्या वर्षी स्थलांतरित मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे मुकुटबन प्रकल्प विस्कळीत झाला होता. विलंब, वस्तूंच्या किंमती आणि कोविड-संबंधित खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे प्रोजेक्टचा खर्च 2,450 कोटी रुपयांवरून 2,744 कोटी रुपये झाला.
लोढा शेअरहोल्डर्सला म्हणाले, “ आपल्या प्रोजेक्टला 20 वर्षांपर्यंत भांडवली गुंतवणुकीच्या एकूण प्रमाणात जीएसटी कडून प्रोत्साहन मिळेल, तसेच तुमच्या कंपन्यांच्या नफ्यात लक्षणीय सुधारणा होइल”.
कंपनीने नवीन चंदेरीया सिमेंट वर्क्स ह्या युनिट्सची क्षमता वाढवली आहे . 150 कोटी रुपये खर्च करून, चंदेरिया येथे सुमारे 0.5 mt वार्षिक उत्पादन क्षमता वाढवली आहे.
कंपनीने कमी व्याज सायकलचा फायदा घेऊन, कर्जाची किंमत सरासरी 9.26 टक्क्यांवरून 7.83 टक्क्यांवर आणली.
लोढा म्हणाले की, कंपनी बाजारपेठेत अशा विस्तार करेल जिथे स्पर्धा आणि सिमेंटची मजबूत मागणी असेल.
कंपनीचे नवीन प्लांट हे अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर ठरणार आहेत. लोढा म्हणाले, बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी, आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड ऑपरेटिंग पॅरामीटर्सनुसार भारतातील सर्वोत्तम कंपनी आहे.
कच्च्या मालावर बोलताना, कंपनीचे सीईओ अरविंद पाठक म्हणाले की, बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडकडे सध्या पुरेसे चुनखडीचे साठे आहेत.
पाठक यांची 31 मार्च 2021 पासून एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती शेअरधारकांसमोर एजीएममध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती.
Comments are closed.