आता हेल्थ मधून साधा वेल्थ, येणार आरोग्य क्षेत्रातून IPO

Medanta brand-owner Global Health files IPO papers with Sebi

ग्लोबल हेल्थने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत.

DRHP नुसार,IPO मध्ये 500 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 4.84 कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.

OFS चा एक भाग म्हणून, अनंत इन्व्हेस्टमेंट 4.33 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करेल आणि ग्लोबल हेल्थचे सह-संस्थापक सुनील सचदेव 51 लाख इक्विटी शेअर्स ऑफलोड करतील.

सध्या, ग्लोबल हेल्थमध्ये अनंत इन्व्हेस्टमेंट्सची 25.67 टक्के हिस्सेदारी आहे आणि सचदेव हे कंपनीमध्ये 13.43 टक्के स्टेकहोल्डर आहेत.

फ्रेश इश्यूतून मिळालेली रक्कम कर्ज आणि जनरल कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया), जेफरीज इंडिया आणि जेएम फायनान्शियल हे IPO चे मुख्य व्यवस्थापक आहेत.

कार्डिओथोरॅसिक सर्जन, नरेश त्रेहान यांनी स्थापन केलेले, ग्लोबल हेल्थ हे भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात सेवा पुरवते.

कार्लाइल ग्रुप आणि टेमसेक सारख्या खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांच्या मदतीनेने ग्लोबल हेल्थ, गुरुग्राम, इंदूर, रांची आणि लखनऊ येथे मेदांता ब्रँड अंतर्गत 4 रुग्णालयांचे नेटवर्क चालवते. एक रुग्णालय पाटणामध्ये लवकरच सुरू होत आहे. आणि दुसरे नोएडामध्ये उभारण्याचे नियोजन आहे.

Comments are closed.