‘ ह्या ‘ कारणासाठी मीशोने उभारला 570 मिलियन डॉलर इतका निधी

Meesho's valuation of $4.9 billion makes it one of India's highest valued startups

सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho ने फिडेलिटी मॅनेजमेंट आणि बी कॅपिटल यांच्या नेतृत्वातील एफ सीरिज राऊंड साठी, 570 मिलियन डॉलर उभारले आहेत. भारतीय स्टार्टअप साठी ही एक महत्वाची गोष्ट आहे.

विद्यमान गुंतवणूकदार प्रोसस व्हेंचर्स, सॉफ्टबँक व्हिजन फंड 2 आणि फेसबुकनेही या फेरीत भाग घेतला, तसेच नवीन गुंतवणूकदारांमध्ये फूटपाथ व्हेंचर्स, ट्रायफेक्टा कॅपिटल आणि गुड कॅपिटल यांचाही समावेश होता. या राऊंडमध्ये कोणत्याही गुंतवणूकदाराने आपला स्टेक विकला नाही.

Meesho पुरवठादार, र्विक्रेता आणि ग्राहक यांच्या दृष्टिकोनातून व्यवसाय करते. येथे र्विक्रेता पुरवठादाराकडून अनब्रांडेड फॅशन वस्तूंसारखा माल खरेदी करतो आणि व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे विकतो. Meesho ने अशाप्रकारे देखील थेट विक्री सुरु केली आहे.

Meeshoने सॉफ्टबँक व्हिजन फंड 2 च्या नेतृत्वाखाली 300 मिलियन डॉलर्स जमा केल्याच्या काही महिन्यांनंतर नवीन निधीसाठी हा पुढचा राउंड होता. कंपनीने सांगितले की निधीच्या शेवटच्या फेरीपासून,ऑर्डरचे प्रमाण 2.5 पट वाढले आहे आणि त्यात नवीन उत्पादन कॅटेगरी देखील जोडल्या गेल्या आहेत.

Meesho ला डिसेंबर 2022 पर्यंत 100 मिलियन मासिक युजर्सपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. कंपनी फंड वापरून तंत्रज्ञान आणि उत्पादन सुविधा देखील वाढवेल.

27 सप्टेंबर 2021 रोजी बर्नस्टाईनने प्रसिद्ध केलेल्या नोटनुसार, Meesho हे भारतातील सर्वात मोठे सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, ज्यात 13 मिलियनहून अधिक र्विक्रेते, 45 मिलियन ग्राहक आणि 1 लाखांहून अधिक पुरवठादार आहेत.

व्हॉट्सॲप आणि फेसबुक सारख्या सोशल प्लॅटफॉर्मच्या मुळे सोशल कॉमर्स पारंपारिक ई-कॉमर्सपेक्षा वेगाने वाढत आहे. फ्लिपकार्टने अलीकडेच त्यांचे शॉपसी ॲप लॉन्च केल्याने या कॅटेगरीत प्रवेश केला आहे.

“आमचा फोकस नेहमीच व्यवसाय ऑनलाईन आणण्यावर राहिला आहे परंतु तेथे बरेच लोक आमच्याकडून थेट खरेदी करत आहेत. आम्ही ग्राहक आणि उद्योजक बाजारपेठ या दोन्ही पध्दतींचा वापर करू.”

Meesho 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये आपली FMCG ऑफर वाढवण्याच्या विचारात आहे.

बी कॅपिटल ग्रुपचे संस्थापक जनरल पार्टनर कबीर नारंग म्हणाले, “Meeshoच्या मजबूत युनिट इकॉनॉमिक्स आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोनावर आम्ही आनंदी आहोत. बिझनेस मॉडेलमध्ये उद्योजक, ग्राहक आणि पुरवठादार यांचा समावेश आहे.”

Comments are closed.