बेक्कार! 175 चा शेअर 475 वर ‘ह्या’ IPO ने घातला धुडगूस

Paras Defence and Space Technologies makes bumper stock market debut

पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीजने 1 ऑक्टोबर रोजी जोरदार पदार्पण केले आहे. कंपनीने इश्यू प्राइसपेक्षा 171 टक्के जास्त प्रीमियमवर लिस्टिंग केली आहे.

175 रुपये प्रति शेअरच्या इश्यू किमतीच्या तुलनेत,कंपनीचा शेअर बीएसईवर 475 रुपये आणि एनएसईवर 469 रुपयांवर उघडला गेला.

आयपीओ वॉच आणि आयपीओ सेंट्रल डेटानुसार, लिस्टिंगच्या आधी, ग्रे स्टॉक मार्केट प्रीमियम 131-134 टक्केवर होता. मात्र आज शेअर्सचे रुपांतर प्रति शेअर 405-410 रुपयांवर पोहचले आहे, जे एकंदरीत 171% आहे.

कंपनीच्या पहिल्याच पब्लिक ऑफरला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. IPO 304.26 वेळा सबस्क्राइब केला गेला, तर 217.26 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली गेली. 71.40 लाख शेअर्स आयपीओ साइझच्या तुलनेत, 38,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बोली लागल्या गेल्या.

पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाची 169.65 पट खरेदी केली, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या राखीव भागाची 927.70 वेळा सदस्यता घेतली गेली, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी राखीव भागाच्या 112.81 पट बोली लावली.

कंपनीने आपल्या पब्लिक इश्यूद्वारे 170.77 कोटी रुपये जमा केले, ज्यामध्ये 140.6 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि स्टेकहोल्डरच्या शेअर्सची विक्री करून 30.2 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर उपलब्ध केली. फ्रेश इश्यूमधून मिळणारी रक्कम यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी, वाढत्या भांडवली गरजांसाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाणार आहे.

सर्व ब्रोकरेजनी डिफेन्स क्षेत्रातील हा IPO सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांमधून यास मदत मिळू शकते.

चॉईस ब्रोकिंगने सांगितले की, “कंपनीचे उत्पादन प्रोफाइल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावी स्थान तसेच प्रचंड वाढीची क्षमता लक्षात घेऊन आम्ही या इश्यूसाठी सबस्क्राइब रेटिंग देत आहोत.

अरिहंत कॅपिटल मार्केट्सनुसार पारस डिफेन्स हे एक मजबूत व्यवसाय मॉडेल आहे, ज्यात उत्पादने आणि सेवांच्या पोर्टफोलिओची विस्तृत उपलब्धता आहे. आम्ही या इश्यूसाठी लाँग टर्म सबस्क्राइब करण्याची शिफारस करत आहोत.

जून 2009 मध्ये स्थापन केलेले, पारस डिफेन्स प्रामुख्याने विविध डिफेन्स आणि स्पेस क्षेत्रातील उत्पादने तयार करते. कंपनी उत्पादनांच्या एकूण 5 प्रमुख श्रेणी ऑफर करते
1) डिफेन्स आणि स्पेस ऑप्टिक
2) हेवी इंजिनीअरिंग
3 ) डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स
4) इलेक्ट्रो मॅग्नेटिक पल्स
5) नीचे टेक्नोलॉजी

स्पेस ऑप्टिक्स आणि ऑप्टो-मेकॅनिकल असेंब्लीसाठी डिझाइन करण्याची क्षमता असलेली ही एकमेव भारतीय कंपनी आहे. कंपनी भारतीय संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रांसाठी ऑप्टिक्स उपलब्ध करते.

Comments are closed.