गो फॅशन IPO झाला मजबूत प्रीमियम वर लिस्ट- वाचा सविस्तर बातमी एका क्लिकवर
Go Fashion (India) Limited चा IPO आपली इश्यू किंमत 690 रू.च्या तुलनेत NSE वर 1,310 वर ट्रेड करत होता. 90% च्या मजबूत प्रीमियमसह शेअरने बाजारात पदार्पण केले आहे. BSE वर गो फॅशनचे शेअर्स 1,316 वर ट्रेड करत होते.
गो फॅशनच्या तीन दिवसीय ऑफरला 22 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी तब्बल 135.46 पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. सदर 1,013.6 कोटी रुपयांच्या IPO ला 80,79,491 शेअर्सच्या तुलनेत 1,09,44,34,026 शेअर्ससाठी बोली मिळाली होती.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले,“गो कलर्स मागील आर्थिक वर्ष 21 मध्ये तोट्यात गेली होती. परंतु , नंतर कंपनीने मजबूत वाढ केली, कंपनी अजून चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.”
IPO ने त्याच्या इश्यू किमतीत 90% वाढीसह मार्केटमध्ये पदार्पण केले आहे. सुरुवातीच्या शेअर विक्रीमध्ये 125 कोटी पर्यंतचा फ्रेश इश्यू आणि 12,878,389 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) होती. पब्लिक ऑफरसाठी किंमत श्रेणी 655-690 प्रति शेअर निश्चित केली गेली होती.
गो फॅशनने 17 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडलेल्या IPO च्या आधी अँकर गुंतवणूकदारांकडून 456 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे.
गो फॅशन ‘गो कलर्स’ या ब्रँड अंतर्गत महिलांच्या बॉटम-वेअर उत्पादनांच्या श्रेणीचा विकास, डिझाइन, सोर्सिंग, मार्केटिंग आणि किरकोळ विक्री करण्यात गुंतलेली कंपनी आहे.
फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या रकमेचा वापर 120 नवीन विशेष ब्रँड आउटलेट्सच्या रोल आउटसाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि कॉर्पोरेट उद्देशांना समर्थन देण्यासाठी केला जाईल. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनीचे 459 EBOs (एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स) नेटवर्क पसरलेले आहे.
Comments are closed.