हिंदुस्थान युनिलिव्हरने अंदाज चुकवले, नफ्यात मोठी वाढ
भारतातील आघाडीची FMCG कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरने आज आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या निकालात कंपनीने अनेक विश्लेषकांचे आणि वृत्तवाहिन्यांचे अंदाज चुकवत या तिमाहीत नफ्यात भरपूर वाढ नोंदवली.
महसूल –
१२४३३३ कोटी – गेल्यावर्षी याच तिमाहीत महसूल १२१८१ कोटी एवढा होता
नफा -
२१९० कोटी – गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १५१५ कोटी होता ज्यात आता ४५% वाढ झाली आहे.
कंपनीच्या ग्राहकसंख्येत २१% वाढ झाली आहे. कंपनीच्या हेल्थ, हायजिन आणि न्यूट्रिशन या तीन सेगमेंटने बिझनेसमध्ये ८०% वाटा नोंदवला. या तिन्ही सेगमेंटमध्ये दुहेरी वाढ झाली आहे. कंपनीच्या होम केअर सेगमेंटने १५%, ब्युटी अँड पर्सनल केअर सेगमेंटने २०%, फूड्स अँड रेफ्रेशमेंट सेगमेंटने ९६% एवढी वाढ नोंदवली.
कंपनीच्या चहाचे ब्रँड्स, केचअप, सूप, आईस्क्रीम या सगळ्या प्रॉडक्ट्सने दोन आकडी वाढ नोंदवली आहे. कंपनीने हॉरलीक्स आणि बूस्ट या दोन प्रॉडक्ट्सचे २ रुपयांचे सॅशे लाँच केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे असे कंपनीने निकालात म्हटले आहे.
या निकालाबरोबरच कंपनीच्या बोर्डाने १७ रुपयाचा डिव्हीडंड देखील जाहीर केला आहे.
हा लेख लिहितेवेळी कंपनीचा शेअर जवळपास १% ने वाढून २४४६ रुपये एवढा होता.
Comments are closed.