प्रत्येक सेकंदाला विकल्या चार स्कूटर्स, फक्त 24 तासात केली ‘ इतक्या ‘ कोटींची कमाई
Ola Electric has sold more than ₹1,100 crore worth of electric scooters during a two-day sale
ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी 16 सप्टेंबर रोजी सांगितले की त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्री दरम्यान पहिल्या 24 तासात 600 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या स्कूटरची विक्री केली आहे.
“आम्ही प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर विकल्या. फक्त 24 तासात, आम्ही 600 कोटींहून अधिक किमतीच्या स्कूटर विकल्या. ही किंमत संपूर्ण 2W उद्योग एका दिवसात जितकी विक्री करतो त्यापेक्षा जास्त आहे”.
“काल हे देखील सिद्ध झाले की, जर उत्पादन चांगल्या प्रतीचे असेल तर भारतात त्याला प्रचंड मागणी असते. यामुळे भारत एक जागतिक EV उत्पादन केंद्र देखील बनू शकते.
त्यांनी असेही म्हटले की आज (16 सप्टेंबर) ग्राहकांसाठी ही स्कूटर खरेदी करण्याचा शेवटचा दिवस असेल आणि ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे ते आज मध्यरात्रीपर्यंत खरेदी करू शकतात.
ओलाने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रथम मार्केटमध्ये आणली होती, जीची किंमत 99,999 रुपये होती. तर S1 प्रो ची किंमत 1,29,999 रुपये होती. गेल्या दोन महिन्यांपासून युजर्सना त्यांचे स्लॉट 499 रुपयांमध्ये बुक करण्याची परवानगी देण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे कंपनीने 15 सप्टेंबरपर्यंत विक्री पुढे ढकलली होती.
सध्या केवळ ओला ॲपवर खरेदीसाठी ऑप्शन उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये गाड्यांची डिलिव्हरी सुरू झाल्यावर ग्राहकांना जास्तीचे 20,000 रुपये भरावे लागतील, असे कंपनीने म्हटले आहे.
सरकारने जाहीर केलेल्या ऑटो आणि ऑटो कम्पोनेंट उद्योगासाठी 26,000 कोटी रुपयांच्या PLI योजनेशी आम्ही एकरूप आहोत. अग्रवाल यांनी ट्विटरवर या निर्णयाचे कौतुक करत म्हटले आहे की, हे पाऊल भारताला जागतिक ईव्ही हब बनण्याचा मार्ग मोकळा करेल.
या आठवड्याच्या सुरुवातीला, अग्रवाल यांनी असेही जाहीर केले की ओला फ्यूचरफॅक्टरी पूर्ण क्षमतेने 10,000 पेक्षा जास्त महिलांद्वारे चालविली जाईल, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठी महिला फॅक्टरी बनेन.
ओला इलेक्ट्रिक तामिळनाडूच्या कृष्णागिरीमध्ये 500 एकर मध्ये फॅक्टरी उभारत आहे, ज्याचे उद्दिष्ट हे वर्षाला 10 मिलियन वाहने बनवण्याचे आहे.
Correction, it’s now 4 scooters sold per sec ????
Buy now on the Ola app https://t.co/RIcwzKSIyt https://t.co/TIczSZLMVt
— Bhavish Aggarwal (@bhash) September 15, 2021
Comments are closed.