टेक्सटाइल क्षेत्रातील ‘ ही ‘ कंपनी वाढवणार उत्पादन क्षमता, गुंतवले 800 कोटी

Welspun India has said it is looking to invest around Rs 800 crore on capacity expansion of its home textiles and flooring businesses over the next two years.

अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचव्या टॉवेलची निर्मिती करणारी वेलस्पन इंडिया लिमिटेडला परदेशात वाढती मागणी मिळत आहे. परदेशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 6.57 अब्ज रुपये कंपनी खर्च करणार आहे.

कंपनी पश्चिम भारतातील अंजार प्लांटमध्ये टॉवेल उत्पादन क्षमता 20% वाढवून वर्षाला 102,000 टन करेल, अशी माहिती कंपनीने शनिवारी संध्याकाळी एक्सचेंज फाईलिंग मध्ये सांगितली. वापी प्लांटमध्ये रग तयार करण्याची क्षमता 80% ने वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

ही गुंतवणूक मार्च 2023 पर्यंत विस्तारली जाईल आणि 2022 च्या एप्रिल तिमाहीपासून त्यातून प्रॉफिट मिळवणे सुरू होईल. ज्याच्या वार्षिक उत्पन्नाची क्षमता सुमारे 12 अब्ज रूपये असेल.

कंपनीचे युनिट वेलस्पन फ्लोअरिंग लिमिटेड दक्षिण भारतातील त्याच्या तेलंगणा प्लांटच्या डि-बॉटलनेकिंगसाठी अतिरिक्त 1.44 अब्ज रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यात नवीन 25-मेगावाटचा रेन्युवेबल पॉवर प्लांट देखील समाविष्ट आहे.

वापी येथे, कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात रगा तयार तयार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी 80 टक्के विस्तार करण्याचा विचार केला आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष 22 आणि आर्थिक वर्ष 23 मध्ये ह्या विस्तारासाठी 656.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

या विस्ताराचे फायदे आर्थिक वर्ष 2023 च्या Q1 पासून टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.

“या विस्ताराच्या दुसऱ्या वर्षापासून 1,207 कोटीची महसूल निर्माण होईल” असेही ते म्हणाले.

याशिवाय, त्यांची उपकंपनी वेलस्पन फ्लोअरिंग लिमिटेडच्या बोर्डाने 143.6 कोटींच्या कॅपेक्सला मंजुरी दिली आहे.

वेलस्पन फ्लोअरिंग लिमिटेडच्या बोर्डाने 18 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 22 आणि आर्थिक वर्ष 23 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 143.6 कोटी रुपयांच्या कॅपेक्सला मंजुरी दिली.

हे सर्व तेलंगणातील सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आहे, ज्यात 25 मेगावॅटचे रेन्युवेबल पॉवर प्लांट उभारणे आणि त्यातून ईएसजीच्या दिशेने वाटचाल करणे हे मुख्य ध्येय आहे.

वेलस्पन इंडियाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षात, त्यांनी कॅपेक्समध्ये 281 कोटी गुंतवले आहेत आणि आर्थिक वर्ष 22 दरम्यान एकूण गुंतवणूक 750 कोटी असेल, ज्यात शनिवारी बोर्डाने होम टेक्सटाइल आणि फ्लोअरिंग व्यवसायासाठी मंजूर केलेल्या गुंतवणूकीचा समावेश आहे.

वेलस्पन इंडिया हा वेलस्पन ग्रूपचा एक भाग आहे, जे लाइन पाईप, होम टेक्सटाईल, वेअरहाऊसिंग, स्टील, ऑईल, गॅस आणि फ्लोअरिंग सोल्यूशन्स यासारख्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय करतात.

Comments are closed.