‘ही’ अमेरिकन कंपनी भारतात करतेय गुंतवणूक, 4400 कोटी रुपयांत खरेदी केले तीन कंपन्यांचे स्टेक

Over the past 14 years, Advent has invested or committed $2.2 billion in 16 companies

अमेरिकन बायआउट फर्म ॲडव्हेंट इंटरनॅशनलने (युरेका फोर्ब्स लिमिटेड, शापूरजी पालोनजी समूहाचा आणि वॉटर प्युरिफायर सेगमेंटमधील क्षेत्रातील जाणते नाव) यांचे मेजॉरिटी स्टेक 4400 कोटींमध्ये खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे.

युरेका फोर्ब्स लिमिटेड, फोर्ब् अँड कंपनी लिमिटेडचे एक युनिट, कंपनीपासून वेगळे केले जाईल आणि बीएसईवर लिस्टेड केले जाईल, असे दोन्ही कंपन्यांनी रविवारी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

युरेका फोर्ब्सच्या लिस्टिंगवर, ॲडव्हेंट कंपनीच्या तत्कालीन थकबाकीच्या 72.56% स्टॉक शापूरजी पालोनजी ग्रूपकडून खरेदी केले जातील. त्यानंतर ॲडव्हेंट कडून ऑफर दिली जाईल.

या प्रोसेसमुळे शापूरजी पल्लोनजी ग्रूपला मदत होईल. ग्रुपच्या एकूण 20,000 कोटींच्या कर्जापैकी 10,900 कोटी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोविड रिलीफ फ्रेमवर्क नियमांअंतर्गत पॅकेज आहे, ज्यामुळे कंपनीला थकबाकी भरण्यासाठी काही पेमेंट अटी देण्यात आल्या आहेत.

एसपी ग्रुपने या ॲसेट कमाईद्वारे 10,332 कोटी उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. स्टर्लिंग आणि विल्सन सोलर यांचा यात समावेश आहे

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने युरेका फोर्ब्स सोबत व्यवहारावर एसपी ग्रुपला सल्ला दिला.

युरेका फोर्ब्सचे एमडी आणि सीईओ श्रॉफ म्हणाले,”आमच्या सतत वाढणाऱ्या ग्राहक वर्गासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी आम्ही आता आणखी वाढ करण्याबाबत उत्सुक आहोत.

युरेका फोर्ब्सला एकूण 20 मिलियन ग्राहक आहेत आणि कंपनीचा व्यवसाय भारतातील 450 शहरांमध्ये आहे. कंपनी आपली उत्पादने मल्टी-चॅनेल नेटवर्कद्वारे विकते, ज्यात थेट विक्री 20,000 आउटलेट आणि ई-कॉमर्स चॅनेलचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 53 देशांमध्ये त्यांचे फूटप्रिंट आहे.

साहिल दलाल (एमडी अॅडव्हेंट इंडिया) म्हणाले,”आम्ही युरेका फोर्ब्सच्या मॅनेजिंग टीमसोबत पार्टनरशिप करण्यास आणि ॲडव्हेंटचे मूल्य निर्माण करण्यास उत्सुक आहोत.

खाजगी इक्विटी फर्म वारबर्ग पिंकस आणि इलेक्ट्रोलक्स देखील युरेका फोर्ब्स घेण्याच्या शर्यतीत होते.

ॲडव्हेंट 2007 पासून भारतात गुंतवणूक करत आहे आणि कंपनीने ग्राहक उत्पादने, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, औद्योगिक आणि तंत्रज्ञान उद्योगांमध्ये 16 कंपन्यांमध्ये 2.2 अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत.

युरेका फोर्ब्स हे भारतातील ॲडव्हेंटचे पाचवे अधिग्रहण असेल. क्रॉम्प्टन ग्रीव्स कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स (कन्झ्युमर इलेक्ट्रिकल गुड्स कंपनी), डिक्सी टेक्सटाइल्स, एनामोर आणि डीएफएम फूड्स हे बाकीचे चार आहेत.

Comments are closed.