म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करायचीय! तर हे पाच फंड पाहा, ज्यांनी याआधी दिलाय भरपूर लाभ…
Five Mutual Fund SIPs investors can consider for investment, based on a 5-star rating from Crisil.
देशातील बहुतांश ऑफर असलेले म्युच्युअल फंड कमी-अधिक प्रमाणात सारखेच असतात. जे गुंतवणूकदारांना मॉर्निंगस्टार, क्रिसिल, इक्रा, व्ह्ल्यू रिसर्च इत्यादी नामांकित रेटिंग एजन्सींकडून रेटिंग द्वारे गुंतवण्यास भाग पाडतात.
खरं तर म्युच्युअल फंडांचे रेटिंग हे रिस्क आणि रिटर्न या दोन्हीचे एकत्रित मोजमाप आहे. जे एका विशिष्ट योजनेत समाविष्ट असलेल्या रिस्क आणि रिवार्ड बद्दल सूचित करते. गुंतवणूकदारांचा ठाम विश्वास आहे की म्युच्युअल फंडामध्ये जास्त स्टार असलेले क्रेडिट नेहमीच चांगले असते.
येथे आम्ही पाच म्युच्युअल फंड एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) देत आहोत, ज्यांना क्रिसिल कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
1) मिरे ॲसेट इमर्जिंग ब्लू-चिप फंड
या फंडाला व्हॅल्यू रिसर्चकडूनही 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. आकडेवारीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या ब्लू-चिप फंडात १ लाख गुंतवले असते, तर आज त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य १.८६ लाख असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षापूर्वी या योजनेत १०,००० रू मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य ६.०६ लाख असते.
2] यूटीआय कोर इक्विटी फंड
ह्या म्युच्युअल फंड ला व्हॅल्यू रिसर्चने 2-स्टार रेटिंग दिली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी १ लाख एवढी गुंतवणूक केली असती, तर त्याच्या पैशाचे मूल्य आज १.५० लाख झाले असते. तथापि, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये १०,००० रू मासिक एसआयपी सुरू केली असती तर गुंतवणुकीचे मूल्य ५.६६ लाख असते.
3] कॅनरा रोबेको ब्लू-चिप इक्विटी फंड
या म्युच्युअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 5-स्टार रेटिंग दिली आहे. गेल्या तीन वर्षांत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत १ लाख गुंतवणूक केली असती, तर त्याचे पैसे आज १.७६ लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये १०,००० रू मासिक एसआयपी केली असती, तर गुंतवणुकीचे मूल्य आज ५.६७ लाख झाले असते.
4] IDBI इंडिया टॉप 100 इक्विटी फंड
या म्युच्युअल फंड योजनेला व्हॅल्यू रिसर्चने 3-स्टार रेटिंग दिले आहे.आकडेवारीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षापूर्वी ह्या योजनेत १ लाख रक्कम गुंतवली असती,तर त्याचे एकूण पैसे १.६१ लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये १०,००० रू मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज त्याच्या म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकीचे मूल्य ५.५३ लाख असते.
5] फ्रँकलिन इंडिया ब्लू-चिप फंड
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ह्या फंडात १ लाख गुंतवणूक केली असती , तर आज त्या गुंतवणूकीचे मूल्य १.४४ लाख झाले असते. तथापि, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये १०,००० रू मासिक एसआयपी सुरू केली असती, तर त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य आज ५.३४ लाख झाले असते.
Comments are closed.