अबब! ११० कोटींचे थेट १३० कोटी.. तेही एका ट्रेडिंग सेशनमध्ये 

Rakesh Jhunjhunwala earned approximately 20 cr profit in just one trading session

भारतीय शेअर मार्केटमध्ये काल मोठी घडामोड घडली.झी एंटरटेनमेंट लिमिटेड म्हणजेच झील या कंपनीचा स्टॉक थेट ४०% नी वाढला. यामुळे काही गुंतवणूकदारांनी बक्कळ पैसा कमावला तर काहींना हळहळ व्यक्त करण्याशिवाय इतर कुठलाही मार्ग नव्हता. इतर गुंतवणूकदारांनी छोटामोठा नफा कमावला असताना भारताचे वॉरन बफेट राकेश झुनझुनवाला यांनी मात्र तब्बल २० कोटी रुपये कमावले.

मंगळवार १४ सप्टेंबर रोजी राकेश झुनझुनवाला यांनी झीलचे ५० लाख शेअर्स विकत घेतले होते.
झीलच्या इतर शेअरहोल्डर्सने नेमकी आदल्या दिवशी सेबीला पत्र [पाठवून पुनित गोयंका यांना हटविण्याची मागणी केली होती. त्यामुळे मंगळवारी झीलचा स्टॉक ४० टक्क्यांनी वाढला. झुनझुनवाला यांनी कंपनीमध्ये ५० लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. जे एकूण पेड-अप इक्विटीच्या ०.५२ टक्के आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी २२० रुपयांना एक याप्रमाणे ५० लाख शेअर्स खरेदी केले होते. ज्यांची एकूण किंमत ११०.२२ कोटी एवढी होती.

काल झीलचा स्टॉक बीएसईवर स्टॉक ४० टक्क्यांनी वाढून २६२ रुपयांवर क्लोज झाला.आणि झुनझुनवाला यांच्या शेअर्स ची किंमत १३०.७५ कोटींवर पोहचली.ज्याचा त्यांच्या फर्मला भरपूर फायदा झाला. याद्वारे झुनझुनवाला यांनी साधारणपणे २०कोटी रुपयाचा नफा कमावला. जो सध्या बाजारात चर्चेचा विषय आहे.

विशेष म्हणजे आज सुध्दा झीलचा शेअर १०% च्या वर ट्रेंड करत होता.

Comments are closed.