‘आ देखें जरा किसमें कितना हैं दम!’ जेव्हा स्टेकहोल्डर देतात ‘एमडीं’ना दणका

Key shareholders seek removal of Zee Entertainment’s MD and CEO

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसचे सर्वात मोठे स्टेकहोल्डर इन्व्हेस्को डेव्हलपिंग मार्केट्स फंड आणि ओएफआय ग्लोबल चायना फंड LLC यांनी एमडी पुनीत गोयंका आणि इतर दोन संचालकांचा राजीनामा घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या कंपनीच्या स्टेक होल्डरनी प्रमोटरना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

याअगोदर २०१८ मध्ये, फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टेकहोल्डरनी कंपनीच्या डायरेक्टरना काढून टाकले होते. स्टेकहोल्डरनी संबंधित डायरेक्टरच्या नियुक्त्या नाकारल्या होत्या. तसेच त्यांच्यावर अनेक आरोप केले होते.

2020 मध्ये, लक्ष्मी विलास बँकेच्या स्टेकहोल्डरनी देखिल एमडी आणि सीईओ एस सुंदर यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळावर सात संचालक नियुक्त करण्याचा प्रस्ताव नाकारला होता. स्टेकहोल्डरनी नकार अशा वेळी दिला होता, जेव्हा बँक मोठ्या आर्थिक संकटातून जात होती. तेव्हा एलव्हीबीला भांडवलाची खूप गरज होती.

2018 मध्ये, अपोलो टायर्स लिमिटेडच्या स्टेकहोल्डरनी प्रमोटरना, नीरज कंवर आणि ओंकार एस कंवर यांचे 30 टक्के वेतन कपात करण्यास भाग पाडले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला आयशर मोटर्स लिमिटेडच्या स्टेकहोल्डरनी सिद्धार्थ लाल यांची एमडी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्याच्या विरोधात मतदान केले होते.

चालू वर्षात, वेदांत लिमिटेडच्या स्टेकहोल्डरनी सेबीचे माजी प्रमुख यू.के.सिन्हा यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यास विरोध केला होता. प्रमोटरच्या पाठिंब्याने हा ठराव मंजूर करण्यात आला होता.

2014 मध्ये, स्टेकहोल्डरनी भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला करार मागे घेण्यास भाग पाडले.

Comments are closed.