क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवा…

5 things to keep in mind while using credit card

फायनांशीयल संस्था, कर्ज आणि क्रेडिट कार्ड अर्जदारांच्या क्रेडिटचे मूल्यमापन त्यांच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये लिस्टेड केलेल्या माहितीच्या आधारे करतात. कर्जदार ह्या माहितीचा वापर पुढे कर्जावरील व्याज दर निश्चित करण्यासाठी करतात.

आपली क्रेडिट एलिजिबिलिटी आणि पोझिशन समजून घेण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आपला क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर वेळोवेळी पडताळणे, असे केल्याने चुकीची माहिती ओळखण्यास मदत होते.तुमचा क्रेडिट स्कोअर देखिल यामुळे खाली येऊ शकतो.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट पडताळताना त्याचे नीट निरीक्षण केले गेले पाहिजे. यासाठी खालील चेकलिस्ट पाहा.

क्रेडिट अकाउंट्स

तुमचे प्रत्येक ॲक्टिव आणि इतक्यात बंद झालेले क्रेडिट अकाउंट क्रेडिट रिपोर्टमध्ये लिस्टेड असते. कर्जदार ह्या माहितीकडे बारीक लक्ष ठेवतात. म्हणून, तुमचे कर्ज आणि क्रेडिट कार्ड अकाउंट डिटेल्स अपडेट केले गेले आहेत की नाही याची खात्री करा. कोणतीही चुकीची माहिती तुमच्या क्रेडिट स्कोअरला धोका पोहोचवू शकते.भविष्यात तुमच्या कर्जावर आणि क्रेडिट कार्ड एलिजिबिलिटीवर याचा परिणाम होऊ शकतो.

रिपेमेंट हिस्टरी

हा सेक्शन तुमच्या कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या रिपेमेंटची माहिती ठेवतो. ज्यात रिपेमेंट तारीख, विलंब झालेली तारीख यांची माहिती असते. ह्या सेक्शन मध्ये समाविष्ट असलेली माहिती कर्जदार तुमच्या क्रेडिट रिपेमेंटचा अंदाज लावण्यासाठी वापरू शकतात. म्हणून, रिपेमेंट हिस्टरी तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये योग्य पद्धतीत लिस्टेड आहे की नाही ते तपासा.

वैयक्तिक माहिती

हा सेक्शन तुमची वैयक्तिक माहिती कॅप्चर करतो, ज्यात तुमचे नाव, पॅन, मोबाईल नंबर,पत्ता इत्यादींचा समावेश असतो. जर कर्जदारास तुम्ही उपलब्ध केलेल्या माहितीत काही विसंगती आढळली,तर तुमचा क्रेडिट अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते.

क्रेडिट युटीलायझेशन रेशो (CUR)

आपल्या क्रेडिट स्कोअर कॅलक्युलेट करताना क्रेडिट ब्युरोद्वारे CUR चा वापर केला जातो. CUR म्हणजे तुम्ही वापरलेल्या एकूण क्रेडिट लिमिट चे गुणोत्तर. 30% च्या आत CUR असलेल्यांना बँका कर्ज देणे पसंत करतात. म्हणून, जे ह्या मर्यादेपेक्षा जास्त वापर करतात, त्यांनी एकतर क्रेडिट लिमिट वाढवावी किंवा नविन क्रेडिट कार्ड घ्यावे.

क्रेडिट रिपोर्ट एन्क्वायरी

हा सेक्शन तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर कर्जदाराने केलेल्या नोंदी ठेवतो. हा सेक्शन कर्जदाराचे नाव,अर्जाची तारीख, अर्ज केलेल्या क्रेडिटचा प्रकार इ. माहिती ठेवतो.

जेव्हा तुम्ही कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता, तेव्हा कर्जदार ब्युरोकडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासतात. यासाठी ते ब्युरोकडे मागणी करतात. अशा कर्जदाराने सुरू केलेल्या विनंत्यांना ‘हार्ड एन्क्वायरी’ असे म्हणतात.

आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही त्रुटी आढळल्यास काय कराल ?

आपल्या क्रेडिट रिपोर्ट लिस्टिंगमध्ये कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास क्रेडिट ब्यूरो किंवा कर्जदाराला कळवा.आपण दर तीन महिन्यांनी एकदा तरी आपला रिपोर्ट तपासला पाहिजे. तुम्ही दरवर्षी चार क्रेडिट ब्युरोपैकी एकाचा क्रेडिट रिपोर्ट विनामूल्य काढू शकता.

Comments are closed.