डिजिटल लोन ऑफरींग मध्येही असणार आता ‘ टाटा चा वाटा ‘

Tata Capital introduces digital ‘Loan Against Mutual Funds’.

टाटा कॅपिटलने ‘लोन अगेंस्ट म्युच्युअल फंड’ ही ऑफर लॉन्च केली आहे. ही पहिलीच एंड -टू -एंड डिजिटल ऑफर आहे, ज्याद्वारे ग्राहकांना 5 लाखापासून 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल.

टाटा कॅपिटलने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डिजिटल लोन ऑफर ही म्युच्युअल फंडांमध्ये इक्विटी आणि डेट स्कीमचा पर्याय म्हणून उभी केली आहे.

कर्जाची एकूण रक्कम म्युच्युअल फंड फोलिओ आणि त्या दरम्यानच्या युनिट्सच्या मूल्यावर आधारित असते.

टाटा कॅपिटलचे मुख्य डिजिटल अधिकारी अबोन्टी बॅनर्जी यांनी सांगितले, “इंवेस्टमेंट कॅटेगरी म्हणून म्युच्युअल फंडांनी गेल्या दशकात प्रचंड वाढ नोंदविली आहे. आमचे लेटेस्ट डिजिटल प्रॉडक्ट ग्राहकांना त्यांच्या पोर्टफोलिओवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, जे ग्राहकांच्या सोयीसाठी सतत नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे”.

एएमएफआय मते, भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची AUM 31 जुलै 2016 रोजी 15.18 ट्रिलियन होती, जी 31 जुलै 2021 रोजी 35.32 ट्रिलियन रुपये इतकी झाली आहे. जी पाच वर्षांच्या कालावधीत दुपटीने वाढली आहे.

म्युच्युअल फंडावरील टाटा डिजिटल लोन हे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणून किंवा एंड टू एंड ऑनलाइन एक्झिक्युशन म्हणून लागू केले जाऊ शकते.

Comments are closed.