अरे चाललंय काय? अजून एका सरकारी कंपनीचे स्टेक विक्रीला

Centre plans to sell 10% stake in Hindustan Copper via OFS for 1,120 cr.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार या आठवड्यात ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे सरकारी मालकीच्या हिंदुस्थान कॉपरमधील 10 टक्के स्टेक विक्री करणार आहे.

बीएसई लिमिटेड आणि एनएसईच्या स्वतंत्र विंडोद्वारे ओएफएस गुरुवारी आणि शुक्रवारी होईल, असे हिंदुस्थान कॉपरने बीएसईला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“भारताचे राष्ट्रपती, भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या माध्यमातून काम करतात आणि त्याचे प्रतिनिधित्व करतात. ते हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे ​​प्रमोटर आहेत,” असेही फाईलिंगमध्ये म्हटले आहे.

सरकार कंपनीच्या एकूण इक्विटी शेअरच्या 10 टक्के प्रतिनिधित्व करणारे 48,351,201 इक्विटी शेअर्स विकणार आहे.

“प्रमोटर कंपनीचे 48,351,201 इक्विटी शेअर्स 16 सप्टेंबर 2021 रोजी विक्रीसाठी उपलब्ध करतील, तर 17 सप्टेंबर 2021 रोजी अतिरिक्त 48,351,201 इक्विटी शेअर्स विकण्याच्या पर्याय उपलब्ध असेल.

हिंदुस्तान कॉपरने बीएसईला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “बीएसई लिमिटेडच्या विंडोद्वारे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) द्वारे ही विक्री होइल”.

ऑफरची फ्लोर किंमत 116 रुपये प्रति इक्विटी शेअर असेल, असे फाईलिंगमध्ये म्हटले आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, खाण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील हा प्रोजेक्ट आहे, जो नोव्हेंबर 1967 मध्ये सुरु करण्यात आला होता. यात बेनिफिटेशन, स्मेलिंग, रिफाइनिंग आणि रिफाइन्ड कॉपर मेटलचे डाउनस्ट्रीम कास्टिंग इ. प्रोजेक्ट सुरू आहेत.

Comments are closed.