कोणता घ्यायचा प्रो, मिनी कि मॅक्स? बघा मॉडेलनुसार आयफोन 13 च्या किंमती
iPhone 13 price and sale date announced
भारतात आयफोन 13 ची किंमत आणि रिलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग ॲपल इव्हेंटमध्ये हा आयफोन लॉन्च करण्यात आला. नवीन आयफोन 13 सिरीज अपग्रेडेड A15 प्रोसेसर आणि लाँगर बॅटरी लाइफसह उपलब्ध असेल. या इव्हेंटमध्ये ॲपलने भारतात आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सच्या किंमतीही जाहीर केल्या आहेत.
आयफोन 13 ची भारतातील किंमत आणि रिलिज डेट
आयफोन 13 तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बेस आयफोन 13 128GB ची किंमत भारतात 79,900 रुपये असेल. याशिवाय, ॲपलने आयफोन 13 (256GB आणि 512GB) हे स्टोरेज पर्याय देखिल भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. भारतात आयफोन 13 च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये असेल. त्याच वेळी, त्याच्या 512GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला 1,09,900 रुपये मोजावे लागतील.
आयफोन 13 गुलाबी, निळा, मिडनाईट, स्टारलाईट आणि लाल अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. भारतात त्याची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 पासून प्री-ऑर्डर करता येतील.
भारतात आयफोन 13 मिनीची किंमत 128GB च्या बेस स्टोरेजसाठी 69,900 रुपयांपासून सुरू होते. त्याचे 256GB आणि 512GB स्टोरेज पर्याय देखील उपलब्ध असतील. त्यांची किंमत अनुक्रमे 79,900 आणि 99,900 रुपये असेल. हा कॉम्पॅक्ट आयफोन गुलाबी, निळा,मिडनाईट, स्टारलाईट आणि लाल या पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. भारतात आयफोन 13 मिनीची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 पासून प्री-ऑर्डर करता येतील.
आयफोन 13 प्रो मॅक्स
भारतात आयफोन13 प्रो मॅक्सची किंमत 128GB च्या बेस स्टोरेज पर्यायासाठी 1,29,900 रुपयांपासून सुरू होते. त्याचे 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्याय देखील उपलब्ध असतील. त्यांची किंमत अनुक्रमे 1,39,900, 1,59,900 आणि 1,79,900 रुपये असेल. हा टॉप एंड आयफोन ग्रेफाइट, गोल्ड, सिल्व्हर आणि सिएरा ब्लू रंगामध्ये उपलब्ध असेल. भारतात आयफोन 13 प्रो मॅक्सची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 पासून प्री-ऑर्डर करता येतील.
आयफोन 13 प्रो
ॲपलने हे डिव्हाइस चार स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. भारतात आयफोन 13 प्रोच्या 128GB बेस मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये आहे. तसेच, त्याच्या 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज प्रकारांची किंमत अनुक्रमे 129900, 149900 आणि 169900 रुपये आहे. हे ग्रेफाइट, गोल्ड, सिल्व्हर आणि सिएरा ब्लू या चार रंगांमध्ये उपलब्ध असतील. भारतात आयफोन 13 प्रो मॅक्सची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 पासून प्री-ऑर्डर करता येतील.
आयफोन 13 सीरीज व्यतिरिक्त, कंपनीने आयपॅड मिनी आणि आयपॅड 2021 देखील लॉन्च केले आहेत. याशिवाय ॲपल वॉच सीरीज 7 देखील लॉन्च करण्यात आली आहे.
Comments are closed.