एअरटेल सोबत VI ने देखील केली दरवाढ, ‘हे’ आहे मुख्य कारण
टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) प्रीपेड युझर्ससाठी 20-25 टक्क्यांनी टॅरिफ प्लॅन वाढवणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या फायलींगमध्ये कंपनीने सांगितले की, सदर टॅरिफ वाढ 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल.
टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) प्रीपेड युझर्ससाठी 20-25 टक्क्यांनी टॅरिफ प्लॅन वाढवणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या फायलींगमध्ये कंपनीने सांगितले की, सदर टॅरिफ वाढ 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल.
सदर नवीन योजना ARPU सुधारण्याची प्रक्रिया सुरू करेल आणि कंपनीला भेडसावणाऱ्या आर्थिक ताणाला तोंड देण्यास मदत करतील.
फिक्स्ड ब्रॉडबँड आणि मोबाइल नेटवर्क टेस्टिंग ॲप्लिकेशन्स कंपनी Ookla नुसार, सदर नवीन टॅरिफ प्लॅन भारतातील सर्वात वेगवान मोबाइल नेटवर्क सुधारण्यास मदत करेल.
“Vi सरकारच्या डिजिटल इंडिया व्हिजनला गती देण्यासाठी आपली भूमिका निभावण्यासाठी वचनबद्ध आहे. आपल्या ग्राहकांना सोपी आणि सोयीस्कर उत्पादने प्रदान करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेनुसार, Vi ने व्हॉइस आणि डेटा या दोन्हींसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनांची श्रेणी तयार केली आहे,” असे म्हटले आहे.
दरम्यान,भारती एअरटेलने देखील अलीकडेच घोषणा केली होती. कंपनीने 26 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या विविध सेवांसाठी दरात वाढ केली असून, हा निर्णय “आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडेल” करण्याकरिता घेतला आहे.
कंपनीने प्रीपेड टॅरिफ 20-25 टक्क्यांनी आणि डेटा टॉप-अप प्लॅनमध्ये 20-21 टक्क्यांनी वाढ केली आहे.
22 नोव्हेंबर रोजी बीएसईकडे दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये, एअरटेलने 26 नोव्हेंबरपासून प्रीपेड दरात 20-25 टक्क्यांनी वाढ केली होती. मोबाइल अवरेज रेव्हेन्यू पर युजर्स (ARPU) 200 ते 300 दरम्यान ठेवण्यासाठी सदर मॉडेल आणले आहे.
Comments are closed.