जॉब शोधताय, तर “ही” संधी गमवू नका

Amazon will be hiring for more than 8000 positions across 35 cities in India including Bengaluru, Hyderabad, Chennai, Gurgaon, and Mumbai.

ॲमेझॉन १६ सप्टेंबर रोजी भारतात पहिल्यांदाच करिअर दिन आयोजित करणार आहे. हा पूर्णपणे ऑनलाईन इव्हेंट राहिल, कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ऑनलाइन रिटेल जायंट उपस्थितांना देशभरात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांविषयी माहिती देतील, तर ॲमेझॉनचे कर्मचारी कंपनीबद्दल माहिती देतील.

इव्हेंटमध्ये १४० अमेझॉन रिक्रयुटर्स नोकरी शोधणाऱ्यांसाठी २,००० पेक्षा जास्त करिअर कोचिंग सत्र ऑफर करतील, ज्यात रेझ्युमे-बिल्डिंग स्किल आणि मुलाखतीच्या टिप्सचा समावेश आहे.

ॲमेझॉनने हे देखील जाहीर केले आहे की ते सध्या देशातील ३५ शहरांमध्ये ८,००० हून अधिक नोकरीच्या संधीं उपलब्ध करत आहेत, ज्यात बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, मुंबई, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, कोईमतूर, जयपूर, कानपूर, लुधियाना, पुणे, सूरत या शहरांचा समावेश आहे. नोकरीच्या या संधी कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, मशीन लर्निंग, एचआर आणि फायनान्समध्ये उपलब्ध आहेत.

दीप्ती वर्मा, (एचआर लीडर- कॉर्पोरेट, एपीएसी) यांनी सांगितले की,“आम्ही बिल्डर आणि इनोव्हेटिव्ह कंपनी म्हणून वाढलो आहोत. कंपनीने पाच सदस्यीय टीम म्हणून सुरवात केली होती आणि आता आमच्याकडे १ लाख कर्मचारी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही भारतात लक्षणीय गुंतवणूक केली आहे. सिएटलच्या बाहेर, भारत हे सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र आहे आणि आमचे लोक केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक ग्राहकांसाठी नवकल्पनांचे नेतृत्व करत आहेत”.

करिअर डे हा अमेरिकेत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला कार्यक्रम होता.हे एक कंपनीसाठी प्रचंड यश होते, आम्हाला ते भारतात लाँच करायचे आहे,या वर्षी करिअर डे नऊ वेगवेगळ्या देशांमध्ये होईल.

कंपनी २०२५ पर्यंत भारतात २० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आतापर्यंत भारतात एकूण १० लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. महामारी सुरू झाल्यापासून सुमारे ३ लाख रोजगार निर्माण झाले आहेत.

“करिअर डे” मध्ये अमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांच्याशी फायरसाइड चॅटसह सेशन असतील, जे स्वतःचा करिअर अनुभव आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करतील. अमेझॉन इंडियाचे ग्लोबल सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड अमित अग्रवाल ओपनिंग इन इंडिया वर कीनोट देतील, त्यानंतर ॲमेझॉन लीडर आणि कर्मचाऱ्यांसोबत पॅनल चर्चा करून ‘लाइफ ॲट ॲमेझॉन’ वर बोलतील.

या कार्यक्रमात, पॅनेल चर्चेमध्ये ॲमेझॉनचे वरिष्ठ लीडर भारतातील ॲमेझॉनच्या वेगाने वाढणाऱ्या तीन व्यवसाय क्षेत्रांचा भविष्यातील दृष्टिकोन शेअर करताना दिसतील. इव्हेंटमध्ये फायरसाइड चॅट देखील असेल ज्यात ॲमेझॉन देशभरात निर्माण केलेल्या कामाच्या संधींवर लक्ष केंद्रित करेल.

उपस्थितांना ॲमेझॉन कर्मचाऱ्यांकडूनही ऐकायला मिळेल ते करिअरमधील स्थित्यंतरे, ड्रायव्हिंग इनोव्हेशन आणि परिवर्तनकारी प्रकल्पांवर काम करण्याविषयी त्यांचे अनुभव सांगतील.

ॲमेझॉन द्वारे हे विनामूल्य करिअर कोचिंग सत्र १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आयोजित केले जाईल.

Comments are closed.