“हिरो” च चाक रुळावरून घसरल, दिवाळीत रुळावर येण्याची अपेक्षा

Hero MotoCorp on Wednesday reported 22 per cent dip in total sales at 453,879 units in August 2021 vs 5,84,456 in August 2020.

मागील काही वर्षांत प्रचंड मागणी असलेली हिरो मोटोकॉर्प ची मागणी काही प्रमाणात थंडावताना दिसत आहे. कंपनी येत्या दिवाळी मध्ये ही मागणी कशी वाढवते हे पाहणे रंजक राहिल.

देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पने बुधवारी एका निवेदनातून म्हटले की कंपनीने ऑगस्टमध्ये एकूण विक्रीत २२ टक्क्यांची घट नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण ४,५३,८७९ युनिटची विक्री झाली.

ऑगस्ट २०२० मध्ये कंपनीने ५,८४,४५६ युनिट्स आपल्या डीलरशिपला पाठवल्या होत्या.

डोमेस्टिक मार्केट मध्ये , कंपनीने गेल्या महिन्यात ४,३१,१३७ युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ५,६८,६७४ युनिट्सच्या तुलनेत २४ टक्क्यांनी कमी आहे, असे हिरो मोटोकॉर्पने एका निवेदनात म्हटले आहे.

कंपनीने म्हटले आहे की ते आगामी सणासुदीसाठी सज्ज होत आहेत,आणि अनेक सकारात्मक उद्देशासह, मार्केट मध्ये उतरु जेणेकरून येत्या काही महिन्यांत मागणी वाढेल.

Comments are closed.