बिऱ्हाड निघालं लंडनला! अंबानी कुटुंब भारत सोडण्याच्या तयारीत – वाचा सविस्तर

मिड डेमधील एका वृत्तानुसार, अंबानी बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क येथील 300 एकर ॲसेटमध्ये राहायला जाण्याची तयारी करत आहेत.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी, हे भारतातून परदेशात स्थायिक होण्याचा विचार करत आहेत. बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चालू होती, पण आता काही रिपोर्टनुसार ही चर्चा खरी असल्याच समोर येत आहे.

मिड डेमधील एका वृत्तानुसार, अंबानी बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क येथील 300 एकर ॲसेटमध्ये राहायला जाण्याची तयारी करत आहेत.

रिपोर्टनुसार, अंबानींनी लॉकडाऊनदरम्यान त्यांचा बहुतेक वेळ ‘ अँटिलिया’ मध्ये घालवल्यानंतर निवासासाठी अजून एखादे ठिकाण असावे,अशी कुजबूज त्यांच्या घरात सुरु होती.

त्यामुळे त्यांनी त्यांची लंडन येथील सदर ॲसेट, जी अंबानींनी 592 कोटी रुपयांना खरेदी केली होती. तेथे घर बांधण्याची तयारी केली.

स्टोक पार्कच्या ॲसेटमध्ये 49 बेडरूम्स, एक अत्याधुनिक हॉस्पिटल तसेच अँटिलियाची प्रतिकृती देखील आहे.

अंबानी कुटुंब त्यांची यंदाची दिवाळी लंडनमध्येच साजरी करत आहे. दिवाळी झाल्यानंतर अंबानी भारतात परत येतील.

रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाला मुंबईहून अधिक चांगल्या प्रकारची स्पेस हवी होती, त्यामुळे अंबानींनी गेल्या वर्षी नवीन घराचा शोध सुरू केला. म्हणून या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी सदर ॲसेट विकत घेण्याचा निर्णय घेतला.

अंबानींच्या नवीन निवासस्थानाची एक मजेदार गोष्ट म्हणजे, 1908 नंतर सदर हवेली, ही एक खाजगी निवासस्थान होते. नंतर त्याचे कंट्री क्लबमध्ये रूपांतर झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही हवेली जेम्स बाँडच्या चित्रपटातही दिसली आहे.

दरम्यान अंबानी कुटुंबाने अद्याप या वृत्तांची पुष्टी केलेली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Comments are closed.