आनंद राठी वेल्थ IPO आणि मिळालेले सबस्क्रिप्शन, वाचा एका क्लिकवर

आनंद राठी वेल्थ लिमिटेडच्या IPO साठी , सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत 10 पट सबस्क्रिप्शन मिळाले.

आनंद राठी वेल्थ लिमिटेडच्या IPO साठी , सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत 10 पट सबस्क्रिप्शन मिळाले.

NSE कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 660-कोटीच्या IPO ला 84,75,000 शेअर्स तुलनेत 8,29,21,509 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली.

गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 25.42 पट, रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदार (RIIs) 7.76 पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs) 2.50 पटीने सबस्क्रिप्शन घेतलं.

12,000,000 इक्विटी शेअर्सच्या IPO ची किंमत प्रति शेअर 530-550 रुपये होती.

कंपनीने बुधवारी अँकर गुंतवणूकदारांकडून 194 कोटी रुपये उभारले होते.

आनंद राठी वेल्थ वित्तीय सेवा उद्योगात म्युच्युअल फंड वितरण आणि आर्थिक उत्पादनांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करते.

इक्विरस कॅपिटल, बीएनपी परिबा, IIFL सिक्युरिटीज आणि आनंद राठी ॲडव्हायझर्स हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर होते.

Comments are closed.