टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची केली घोषणा, वाचा कधी होणार दरवाढ

मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सने नवीन वर्षातही वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने 1 जानेवारी 2022 पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी सर्व प्रकारच्या व्यावसायिक अवजड वाहने, बसेसच्या किमती वाढवणार आहे. मात्र, प्रत्येक वाहनाच्या किमतीतील वाढ मॉडेल प्रकारावर आधारित असेल. 

टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टील, अॅल्युमिनियमसह अनेक धातूंच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः सहन करत आहे, परंतु काही भाग किमती वाढवून भागवला जात आहे. टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. मात्र, टाटा मोटर्सने अद्याप प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ केलेली नाही.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यापासून किंमतीत वाढ झाल्यामुळे आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे किमती वाढवून त्याचा काही भाग ग्राहकांना देणे गरजेचे झाले आहे. कंपनीच्या मते, जानेवारी 2022 मध्ये किंमती वाढवण्याची योजना आहे. किमतीतील वाढ वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल.

Comments are closed.