अखेर कोवॅक्सिनला परवानगी!आता ‘ या ‘ देशाकडून मिळाली मान्यता

Bharat Biotech's Covaxin, along with China's BBIBP-CorV, has become the latest entrants into Australia's official list of approved vaccines.

ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. यामुळे ही लस घेतलेल्या भारतीयांना तेथे प्रवेश दिला जाईल.

1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात कोवॅक्सिनला मान्यताप्राप्त जॅब्सच्या अधिकृत यादीमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने भारतात दिल्या जाणार्‍या कोविशील्ड लसीला याअगोदरच परवानगी दिली आहे.

या दोन्ही लसींना मान्यता देण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टन डीसी येथे क्वाड शिखर परिषदेच्या वेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत उपस्थित केला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स ॲडमिनिस्ट्रेशन (TGA) ने कोवॅक्सिनला अधिकृत मान्यता दिली. तसेच त्यांनी BBIBP-CorV ही चिनी लस सुध्दा मंजूर केली.

“TGA ने कोवॅक्सिन आणि BBIBP-CorV या लसीना परवानगी दिली. “सदर मान्यता 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रवाशांसाठी आहे, ज्यांना कोवॅक्सिनद्वारे लसीकरण करण्यात आले आहे आणि ज्यांना BBIBP-CorV ची लसीकरण करण्यात आले आहे अशा 18 ते 60 वयोगटातील प्रवाशांसाठी आहे,” ऑस्ट्रेलियन आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन आरोग्य विभागाने सांगितले “कोवॅक्सिन आणि BBIBP-CorV ची मान्यता तसेच कोरोनाव्हॅक आणि कोविशील्ड यांना दिलेली मान्यता म्हणजे पूर्ण लसीकरण मानले जाईन.

ऑस्ट्रेलियन टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने हे देखील निर्धारित केले आहे की ज्यांना TGA मान्यताप्राप्त लसीचे दोन डोस मिळाले असतील, त्यांना प्रवेश दिला जाईल.

यामध्ये होमोलॉगस (एकाच लसीचे दोन डोस) आणि हेटरोलॉगस (दोन वेगवेगळ्या टीजीए-मंजूर किंवा मान्यताप्राप्त लसींचे दोन डोस) यांचा समावेश आहे.

Comments are closed.